Solapur Crime : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, दोन माजी नगरसेवकांसह 17 जणांवर जुगारप्रकरणी गुन्हा; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pandharpur Police Action in Sangola : पंढरपूरच्या परीविक्षाधीन पोलिस अधिकारी शुभम कुमार यांना सांगोला येथील वासू चौकामधील बस स्टॅन्ड समोरील यश प्लाझा या ठिकाणी जुगार चालत असल्याची गोपीनय माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती.
Sainath Abhangrao
Sainath AbhangraoSarkarnama
Published on
Updated on

Solapur,19 May : सांगोला येथील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणारे शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, सांगोल्याच्या दोन माजी नगरसेवकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 35 लाख 34 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत पुढाऱ्यांसह एक पोलिस कर्मचारीही असल्याची माहिती आहे

साईनाथ अभंगराव (Sainath Abhangraoरा. पंढरपूर) हे सध्या शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटासोबत आहेत. त्यांच्यासह सांगोल्याचे माजी नगरसेवक आनंदा गोरख माने (माजी रा. अहिल्यानगर, सांगोला), माजी नगसेवक सिद्धेश्वर दशरथ जाधव (रा. पुजारवाडी, सांगोला) अक्षय संतोष गवळी, अभिषेक गजेंद्र माने, योगेश दिंगबर माने (चौघेही रा. जुनी पेठ पंढरपूर), जितेंद्र विठ्ठल चंदनशिवे (रा. भीम नगर, सांगोला), उत्कर्ष अनंत देसाई (रा. देवकते मळा, पंढरपूर), कुमार शामराव गोडसे (रा. लोणारवाडी, ता. पंढरपूर), गणेश शिवाजी निचळ (रा. मित्र नगर, मंगळवेढा), दुर्योधन लहू मिसाळ, ईश्वर देवराव मिसाळ व अमोल सुखदेव केंगार (तिघेही रा. वाघोली, ता. माळशिरस), लखन राजू चव्हाण (रा. रामोशी गल्ली, सांगोला), सोमनाथ सुरज यलगर (रा. मोहोळ), सुनील बबन चव्हाण (रा. एसटी स्टँड पाठीमागे फलटण, जि. सातारा), सागर हनुमंत मदने (रा. शुक्रवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sainath Abhangrao
Rohit Pawar on Munde : मुंडे बंधू-भगिनीला आमदार रोहित पवार यांचा टोला, ‘हे शोभत नाही...’

पंढरपूरच्या (Pandharpur) परीविक्षाधीन पोलिस अधिकारी शुभम कुमार यांना सांगोला येथील वासू चौकामधील बस स्टॅन्ड समोरील यश प्लाझा या ठिकाणी जुगार चालत असल्याची गोपीनय माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर शुभम कुमार यांनी खासगी वाहनाने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले. यश प्लाझा येथील चौऱ्या मजल्यावर रूम नंबर 108 मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला असता 16 ते 17 व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ नारायण अभंगराव, माजी नगरसेवक आनंदा गोरख माने आणि सिद्धेश्वर दशरथ जाधव यांच्यासह 17 जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

Sainath Abhangrao
Tanaji Sawant : फडणवीसांना जाहीर सभेत दिलेला शब्द तानाजी सावंत कसा पूर्ण करणार?

पोलिसांना जुगार खेळताना आढळून आलेल्या 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, संबंधित ठिकाणी पोलिसांना जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, जुगारींची वाहने असा एकूण 35 लाख 34 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

Sainath Abhangrao
Beed Lok Sabha Analysis : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीड लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे 'असे' आहे गणित..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com