Sharad Pawar News : शरद पवार अजित पवारांच्या 'ताकदी'चा फैसला अधिवेशनाच्या पहिल्या तासातच लागणार

Ncp News : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar News
Sharad Pawar, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Monsoon Session News : शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि ठाकरे-पवार विरोधक यांच्यातील नव्या संघर्षाला पावसाळी अधिवेशनात प्रारंभ होईल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील लढाईऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचे म्हणजे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे किती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूला किती आमदार असतील याचा फैसला होणार आहे. त्यातून पक्षीय पातळीवर शरद पवारांचे पारडे जड की अजित पवार भारी याचाही निकाल लोकांपुढे येईल.

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत नेमका किती आमदारांचा आकडा आहे हे स्पष्ट झालेले नाही. शरद पवार यांच्या गटाकडे १९ आमदार असल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले, तरी विधीमंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे संख्याबळ स्पष्ट होणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar News
Sharad Pawar News : सर्व्हेच्या आकड्यांनी अजितदादांच्या गटाची धडधड वाढली? थेट पवारांनाच गाठले...

अधिवेशनामध्ये कोणते आमदार कोणत्या बाजूला दिसणार यावरुन त्यांचा पाठिंबा कुणाला आहे हे स्पष्ट होईल. कारण अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार हे सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसोबत बसतील तर शरद पवार यांच्या गटातील आमदार हे जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत विरोधी आमदारांच्या बाकावर असतील. विरोधी बाकावर काँग्रेस (Congress), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार असतील.

आमदारांची भूमिका तळ्यात-मळ्यात

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून कोणत्या गटात किती आमदार आहेत. याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदारांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा असल्याचे सांगितले होते. तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली होती. तर काही आमदारांनी भूमिकाच स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे कोणत्या गटात किती आमदार आहेत याची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही.

Sharad Pawar, Ajit Pawar News
Sharad Pawar News : बंडानंतर राष्ट्रवादीचे मंत्री भेटायला गेले, पण शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणात शरद पवार यांचे वय काढले होते. त्यानंतर शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे दोन्ही पवारांमध्ये संघर्ष पाह्यला मिळाला होता. अजित पवार यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी घेतलेल्या भूमिकांवरुनही नाराजी व्यक्त केली होती.

अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळ बुचकळयात

मात्र, आज (ता. १६ जुलै) अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीमध्ये मंत्र्यांनी शरद पवार यांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिली पाहिजे. याचा विचार करावा, अशी विंनती त्यांना केली. त्यांनी शांतपणे आमचे म्हणणे ऐकून घेतले. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी शरद पवार यांची अचाणक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळ बुचकळयात पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदही गोंधळले, असे असले तरी उद्या अधिवेशनाच्या पहिल्या तासालाच चित्र स्पष्ट दिसेल.

Sharad Pawar, Ajit Pawar News
NCP Ministers Meet Pawar: शरद पवारांना पाहताच झिरवळ अन् बनसोडे पाया पडले; तर भुजबळ म्हणाले, 'विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला..'

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आम्हाला 19 आमदारांचा पाठिंबा असला तरी सगळ्याच आमदारांच्या मनामध्ये शरद पवार आहेत. त्यामुळे सगळेच आमदार आमच्यासोबत आहेत. तर अजित पवार यांच्या बाजूनेही आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळी अधिवेशनात आमदारांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

जयंत पाटलांचे विधानसभा अध्यक्षाना पत्र

दरम्यान, जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभागृहातील बैठक व्यवस्था विरोधी पक्षातच करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी पक्षाच्या उर्वरीत सदस्यांची विधानभा सभागृहात विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी असे पत्र पाटील यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com