Sharad Pawar News : सर्व्हेच्या आकड्यांनी अजितदादांच्या गटाची धडधड वाढली? थेट पवारांनाच गाठले...

NCP politics News : राज्यातील सर्व्हेची आकडेवारी अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारी आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एक मेकांवर आरोप-प्रत्योरोपही झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आज (ता.१६) शरद पवार यांना भेटण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, खातेवाटपासाठी अनेक दिवस वाट पहावी लागली. त्यानंतर अजित पवार यांना दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घ्यावी लागली. यावरुन राज्यभरात चांगलीच चर्चा झाली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यात अनेक सर्व्हे झाले.

Ajit Pawar News
Sharad Pawar News : बंडानंतर राष्ट्रवादीचे मंत्री भेटायला गेले, पण शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले असले तरी राज्यातील मतदार मात्र, शरद पवार यांच्या सोबत आहेत. तसेच पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. राज्यात झालेल्या सर्व सर्व्हेमध्ये शरद पवार यांच्या गटाचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शरद पवार यांना सोडून आपला गट किती प्रभाव पाडू शकेल, याची शाश्वती नसल्यामुळेच अजित पवार यांनी मंत्र्यांसह वाय. बी. चव्हाण सेंटर गाठल्याची चर्चा आहे.

'सकाळ-साम'ने केलेल्या महासर्व्हेमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपले मत? यावर मतदार म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे 38.7 टक्के मतदारांनी म्हटले आहे. तर 13.3 टक्के मतदारांना नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे. 30.1 टक्के मतदारांनी सांगितले की आमदारांना कायमस्वरुपी निवडणुक लढविण्यावर बंदी आणावी, तर यापैकी नाही, असे 18 टक्के मतदारांनी म्हटले होते.

Ajit Pawar News
NCP Minister Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीत काटे उलट फिरणार..; अजित पवार मनोमिलनासाठीच पवारांकडे ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झालेल्या बंडात आपल्याला कुणाची बाजू योग्य वाटते, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सहभागी ४३. ६ टक्के मतदरांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. तर अजित पवार यांना २३.१ टक्के तर ३३.३ टक्के मतदारांनी सांगता येत नाही असे सांगितले आहे. या उत्तरांवरून शरद पवार यांना मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीमुळेच अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, ''आम्ही सर्वजण अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी बसलो होते. शरद पवार (Sharad Pawar) आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो होते. शरद पवार हे आज त्यांच्या कामानिमित्त वाय. बी. चव्हाण सेंटर येथे येणार होते. याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. आम्ही त्यांना विंनती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहिली पाहिजे. याचा विचार करावा. त्यांनी शांतपणे आमचे म्हणणे ऐकून घेतले. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही''.

Ajit Pawar News
NCP Minister Meet Sharad Pawar : मोठी बातमी : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ते म्हणाले सत्तेत गेलेले आमचे सर्व सहकारी शरद पवार यांना भेटायला आले होते. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. ही भेट आमच्यासाठी अनपेक्षीत होती. या भेटीमागचा उद्देश आजच सांगणे अवघड आहे. या बाबात आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करु, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com