Chhagan Bhujbal News : देशाच्या 'ओबीसी' व्यासपीठावरून छगन भुजबळांचा नेमका कुणाला इशारा ?

OBC Leader Chhagan Bhujbal : व्ही.पी. सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील कार्यक्रमात छगन भुजबळ राहणार उपस्थित
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

NCP And OBC Leader Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेतेपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळा पाच वर्षे एक महिना झाल्याचाही उल्लेख केला. त्यामुळे अजितदादांचा प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या इच्छेनंतर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही समाजिक गणित पुढे करत करत दोन्हीपैकी एका पदावर दावा ठोकला आहे. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद मराठा दिले तर विरोधीपक्ष नेते पद इतर मागस वर्गाला 'ओबीसी' द्यावे. किंवा प्रदेशाध्यक्ष पद 'ओबीसी'ला दिले तर विरोधीपक्ष नेतेपद मराठा समाजाला देण्याची मागणी केली आहे. यावेळी मला संधी दिली तर तयार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

Chhagan Bhujbal
Sanjeev Jaiswal News : सत्तासंघर्षात सनदी अधिकाऱ्यांचा बळी ? संजीव जयस्वाल यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, शुक्रवारी (ता. २३) पाटणा येथे भाजपविरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीननंतर भुजबळ आता दिल्लीमध्ये होणाऱ्या देशपातळीवरील ओबीसी समाजाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. तेथे ते देशातील 'ओबीसी' समाजाबद्दल बोलणार आहेत. या व्यासपीठावरून ते कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal
School Exam: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास होणं बंधनकारक

छगन भुजबळ माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या जयंतीनिमित्त दि. २५ जून रोजी दिल्लीमधील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी देशाभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भुजबळ मंडल आयोग, ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना अशा विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील 'ओबीसीं'चे स्थान आणि भाजपविरोधकांसाठी 'ओबीसी' समाजाचे महत्व, याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिवंगत नेते शरद यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यानंतर 'ओबीसी' समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व भुजबळ यांनी करावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना आणि नेत्यांनी केली होती. त्यास प्रतिसाद देताना छगन भुजबळ यांनी 'ओबीसी' आणि मागास घटकासाठी आपण नेहमीच संघर्ष करत राहणार आहोत असे मत व्यक्त केले होते. व्ही.पी. सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सामाजिक न्यायाचा वारसा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com