Deven Bharti : CM फडणवीसांचे फेवरेट 'देवेन भारती' मुंबई पोलिसांचे नवे बॉस : 2 ज्येष्ठांचा अन् लेडी सिंघमचा पत्ता कट

Deven Bharti : मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (30 एप्रिल) सेवानिवृत्त होणार आहेत.
Deven Bharti
Deven BhartiSarkarnama
Published on
Updated on

Deven Bharti : मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (30 एप्रिल) सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर भारती यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

मुंबईला जागतिक पातळीवर असलेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक महत्वामुळे इथले पोलीस आयुक्तपदीही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या पदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मर्जीतील अधिकारी अशी ओळख असलेल्या देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे.

Deven Bharti
CM Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यात दगावलेल्या जगदाळेंच्या मुलीला मिळाली सरकारी नौकरी

कोण आहेत देवेन भारती?

मुळचे बिहारचे असलेल्या देवेन भारती यांची कर्मभूमी महाराष्ट्र राहिली आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते सर्वात जिकिरीच्या पदावर म्हणजे पोलिस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता.

याशिवाय फडणवीस मुख्यमंत्री असताना, जे डे यांच्या मृत्यू प्रकरणासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला होता. दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती. पण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले होते.

Deven Bharti
Devendra Fadnavis News : 'माझ्या फोटोचे बॅनर असले तरी काढा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका अॅक्शन मोडमध्ये!

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी भारती यांच्याकडे पुन्हा क्रीम पदावर पोस्टिंग झाली. भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले. त्यांनाच या पदावर पहिली नियुक्ती मिळाली होती. आता ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबादीर घेणार आहेत.

दोन ज्येष्ठांचा अन् लेडी सिंघमचा पत्ता कट :

सेवा ज्येष्ठतेनुसार महासंचालक संजयकुमार वर्मा, प्रतिनियुक्तीवर असलेले ‘एनआयए’चे प्रमुख सदानंद दाते आणि पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांचीही नावे चर्चेत होती. पण या तिघांचाही पत्ता कट झाला आहे. त्यागी यांची नियुक्ती झाली असती तर त्या मुंबईच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त ठरल्या असत्या.

पूर्वी मुंबई पोलिस आयुक्तपद अतिरिक्त महासंचालक दर्जाचे होते. 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रेणी वाढवून हे पद महासंचालक दर्जाचे केले. पण 31 जुलै 2024 रोजी पुन्हा हे पद अतिरिक्त महासंचालक दर्जाचे करण्यात आले. 1990 बॅचचे अधिकारी असलेले वर्मा हे आधीच महासंचालक दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांचा विचार झाला नसल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com