Manisha Kayannde News : 'कोण मनिषा कायंदे? स्वार्थासाठी आलेले लोक..' ; ठाकरे गटाचे नेते बरसले !

Manisha Kayannde Leave Uddhav Thackerya Group : मनिषा कायंदे हे विधान परिेषेदेवरील आमदार..
Manisha Kayannde News :
Manisha Kayannde News : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाला वर्धापन दिनाच्यापूर्वीच जोरदार धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे (Manisha Kaynade will Join Shinde group) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. मनिषा कायंदे या मागील काही तासांपासून नॉट रिचेबल होत्या. आज ठाकरे गटाचे महाशिबिर मेळावा वरळीत आयोजित केले आहे, त्यापूर्वीच हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो.

Manisha Kayannde News :
CM Shinde Meet Bansode: मुख्यमंत्री शिंदेंना बोलावले शिवसेना खासदारांनी; मात्र, चर्चा झाली राष्ट्रवादीच्या आमदाराची

दरम्यान याबाबत ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अजय चौधरी (Ajya Choudhary) यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. ठाकरे गटाच्या महाशिबिर मेळाव्यात चौधरी यांनी विचारण्यात आले की, लालबाग परळ दादर मध्ये राहणाऱ्या ठाकरे गटाच्या विधानपरिषेच्या आमदार अखेर पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय?"

यावर उत्तर देताना अजय चौधरी म्हणाले, 'कोण मनिषा कायंदे? ठिक आहे, ज्यांना शिवसेना समजली, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व समजलं, तो कधीच शिवसेना सोडण्याचं विचार करत नाही. स्वार्थाकरता आलेले लोकं गेले, त्याच्यामुळे शिवसेनेला काही फरक पडत नाही, असे चौधरी म्हणाले.

Manisha Kayannde News :
Aditya Thackeray On Ambedkar : आंबेडकरांची औरंगजेब कबरीवर फुलं वाहण्याची कृती; आदित्य ठाकरे म्हणाले..

कोण आहेत मनिषा कायंदे ?

मनिषा कायंदे यांनी 25 ते 30 वर्षे भाजपमध्ये काम केलं. त्या पुर्वाश्रमीच्या भाजपच्या आहेत. 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषेदेचे तिकीट दिले. विधान परिषदेवर जाणं हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट होता, असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.