Ambadas Danve : महाआघाडीचे नेते शपथविधीला का जाणार नाहीत? : अंबादास दानवेंनी सांगितले कारण...

Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यावर आमचा अलिखित बहिष्कार वैगेरे काही नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येतं आहे, त्यांचे स्वागत आहे. पण मी याला बहिष्कार म्हणणार नाही.
Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis-Ambadas Danve
Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis-Ambadas Danve Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 05 December : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहे. मात्र, जायचं कशाला? कारण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तुम्ही जिंकलेच कसे, अशा आहेत. ईव्हीएमवर जिंकले. निवडणुकीत पैशाचा अतिरेकी वापर, लोकशाही तत्वांची पायमल्ली या सर्व गोष्टींवर हे जिंकले आहेत, त्यामुळे महायुतीच्या विजयावर लोकांना संभ्रम आहे. आम्हाला नाही पटलं, त्यामुळे आम्ही महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला जात नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या (Mahayuti Government) शपथविधी सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते जाणार नाहीत. त्यामागचे कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve ) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या सात महिन्यांत पडतो, त्यांना लोक कसे निवडून देतात. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना कसे निवडून देतात. महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूरसारखी घटना घडली आहे, त्यांना कसे निवडून देतात. राज्यात मागील दोन अडीच वर्षांत एकही नोकर भरती झालेली नाही. बेरोजगारी वाढलेली आहे, तरीही त्यांना लोक निवडून देतात, हे राज्यातील जनतेला पटलेले नाही. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांच्या बळावर हे सरकार आलेले आहे.

Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis-Ambadas Danve
Eknath Shinde Deputy CM : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी; पण, मनातील मंत्रिपदाऐवजी शिंदेंना मिळणार ‘हे’ खाते!

विरोधी पक्षाचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार, असं मी म्हणणार नाही. आम्हाला नाही पटलं, त्यामुळे आम्ही जाणार नाही. त्यामुळे बहिष्कार वैगेरे शब्द मी वापरणार नाही. ज्याला जायचं आहे, ते जाऊ शकतात. पण माझं मन नाही म्हणतं, त्यामुळे मी जात नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शपथविधी सोहळ्यावर आमचा अलिखित बहिष्कार वैगेरे काही नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येतं आहे, त्यांचे स्वागत आहे. पण मी याला बहिष्कार म्हणणार नाही.

Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis-Ambadas Danve
Mahayuti Government : पवारांसह ठाकरे बंधू महायुती सरकारच्या शपथविधीला जाणार नाहीत

आपल्या पक्षाची ताकद वाढविणे, हे कोणत्याही पक्षाची पद्धत असते. आज भाजप 135 जागा जिंकलेले आहे, त्यांच्यासोबत अपक्ष जात आहेत. अजितदादा त्यांच्यासोबत आहेत. ज्यांनी त्रास दिलेला आहे, त्यांना कोणी सोडत नसतं. शेवटी आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपली सत्ता असावी, असे प्रत्येक पक्षाला वाटत असते. आज भाजपला वाटत असेल की आपण 150 जागा लढून 132 जागा जिंकलो, तर उद्या 288 जागा लढवून 150 ते 200 जागा जिंकू शकतेा. हा त्यांचा समज असणं चुकीचं आहे का. असं झालं तर मग ह्यांची मनधरणी करा, त्यांच्या घरी जा, या भानगडी राहत नाहीत, असे सांगून दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com