Mumbai : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच आगामी निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेना (ठाकरे गट) भाजपबरोबर कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, असं सांगितलं.
या बरोबरच शिवसेनेत झालेल्या बंडाबाबत त्यांनी यावेळी मोठा खुलासा केला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सूरत आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना थांबवलं का नाही? याचं कारण आज पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं आहे.
ठाकरे म्हणाले, ''ही सगळी माणसं विकली गेली. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढणार? ज्यांना जायचं त्यांच्यासाठी दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबावं. अन्यथा गेट आऊट. त्यामुळे मी त्यांना कशाला थांबवू. मला विकली गेलेली माणसं नकोत''.
''कुणी सांगेल तशी भूमिका घ्यायची इतका लाचार मी झालो नाही आणि होणारही नाही. लोकं येतात-जातात. अनेक जण मला विचारतात तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही थांबवलं का नाही? पण त्यांना कशाला थांबवू'', असा खुलासा आज ठाकरेंनी केला.
''सध्या भाजपमध्ये जा किंवा थेट तुरुंगात जा अशी परिस्थिती देशात सुरू आहे. पत्रकारांच्या हातात नेहमी कलम असायला हवं. मात्र, सध्या अनेक पत्रकारांच्या हातात कमळ दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला शेवटची आशा आहे''.
''लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसामान्य जनतेलाही पुढं यावं लागणार आहे. ही लढाई फक्त शिवसेनेची (ठाकरे गट) नाही. तर आपल्या सर्वांची आहे'', असं ते म्हणाले.
''भाजपने शिवसेनेचा वापर करुन घेतला. वापर करा आणि फेका ही निती भाजपची आहे. आमच्या हिंदुत्वावर बोलता मग भाजपने हिंदुत्व कधी स्वीकारलं होतं? ममता बॅनर्जींचा पाठिंबा घेतला तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व?''
''काँग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणता मग काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं? तेव्हा कुठं होतं तुमचं हिंदुत्व?'', असा घणाघात ठाकरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.