Mantrimandal Vistar News: गोगावलेंनी वाढवलं शिंदे-पवारांचं 'टेन्शन'; मंत्रिपदांबाबत केला मोठा दावा

Cabinet Expansion And Shivsena : आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Cabinet Expansion And Bharat Gogawale : शिवसेना फुटीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. पहिल्या मंत्रिमंडळात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, वर्षानंतरही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज झाले होते. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारमध्ये सहभागी झाली. त्यामुळे शिंदे गटात असंतोष पसरल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असण्याची शक्यता आहे. राज्यात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री आहेत. आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यातील तब्बल सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दावा सांगितला आहे. यासह भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Bharat Gogawale
Uddhav Thackeray Press Conference : इतरांवर 'भ्रष्टाचाराचे कलंक' लावून त्यांनाच मंत्री केलं, त्याचं काय? ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना मंत्रिपदांची आशा आहे. मात्र वर्षभरानंतरही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत येण्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत दिले. आता १७ जुलै रोजी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खाते वाटप करून मंत्रिमंडळ विस्तारही होणार असल्याची चर्चा आहे.

Bharat Gogawale
Uddhav Thackeray Question to PM Modi : 'त्या' सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचं काय झालं? ठाकरेंचा मोदींना थेट सवाल

याबाबत भरत गोगावले म्हणाले, "आता १४ मंत्रिपदांसाठी विस्तार होणार आहे. त्यातील सात मंत्रिपदे शिवसेनेच्या आमदारांना मिळणार आहेत. सोमवारी रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. मात्र अद्याप निरोप आलेला नाही. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आम्ही तयारच आहोत. फक्त फोन येऊ द्या, मग आम्ही निघालोच."

दरम्यान, गोगावले यांच्या दाव्याने राज्य सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपावरून नाव तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा सोडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com