MNS Alliance : मनसेचा मविआत एन्ट्रीचा मार्ग मोकळा? उद्याच्या बैठकीत निर्णय होणार; शरद पवारांचे संकेत

MNS Alliance : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीत सामिल होण्यासाठी सज्ज आहे. यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे.
MNS_MVA
MNS_MVA
Published on
Updated on

MNS Alliance : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीत सामिल होण्यासाठी सज्ज आहे. यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. पण काँग्रेसनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्यानं याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

दरम्यान, येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मनसेला लवकरात लवकर सोबत घेऊन जागा वाटप आणि प्रचाराचं धोरणं आखणं मविआसाठी महत्वाचं आहे. यापार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत मनसेच्या समावेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. खुद्द शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले आहेत.

MNS_MVA
Bhor Politics: भाजपाच्या मनसुबांना अजित पवारांचा दे धक्क! भोरमध्ये थोपटे मिळाले पण महत्त्वाचा मोहरा गळाला

मनसेला सोबत घेण्याबाबत शरद पवार म्हणाले, "मलाही असं वाटतंय की, सध्याच्या परिस्थितीत जर कोणी पर्याय देऊ शकत असेल तर टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. काँग्रेसनं सुद्धा विचार करावा, पण मी आत्ता काही सांगू शकत नाही, उद्या आमच्या (मविआ) बैठकीत सर्वांचं मत घेऊन निर्णय होईल"

MNS_MVA
Parbhani News : पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या जिंतूरमध्येच महायुती तुटली! राष्ट्रवादीकडून साबिया बेगम यांची उमेदवारी जाहीर

या विधानाद्वारे शरद पवारांनी स्पष्टपणे याचे संकेत दिले आहेत की, उद्याच्या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत निश्चितच निर्णय होऊ शकतो. यासाठी शरद पवार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या केंद्रीय नेृतृत्वाशी चर्चा करु शकतात. त्यामुळं उद्याच्या बैठकीत जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जन्माला येणार आहे.

MNS_MVA
Karad Politics : पृथ्वीराज चव्हाणांची राईट हॅन्डनेच साथ सोडली; शिल्लक राहिलेल्या काँग्रेससाठी उदयसिंह उंडाळकरांचा गळ?

एकूणच मनसेच्या मविआत समावेशानंतर महायुतीला मोठं आव्हान निर्माण होणार आहे. कारण मुंबईत शिवसेनेची जशी ताकद आहे. तसाच मनसेला मानणारा वर्गही मोठा आहे. राज ठाकरेंचा मुंबईत करिश्मा आहे. तसंच प्रचारात राज ठाकरेंकडून मतोचोरीपासून मराठी जनांच्या भावनिक मुद्द्यांना हात घालून त्यांना प्रभावित करण्याची ताकद असल्यानं महायुतीसाठी मनसे डोकेदुखी ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com