MNS And ShivsenaUBT: राज ठाकरेंचा 'हा' विश्वासू नेता 'दोस्तीचा वादा' निभावणार; थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचाच प्रचार करणार?

Raj Thackeray And Uddhav Thackeray : 'कल्याण ग्रामीण'मध्ये शिंदे गटाने सहकार्य न केल्याने याचा वचपा अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत काढण्याचा विचार मनसैनिकांनी केला आहे. शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार अंबरनाथ मनसैनिकांनी केला आहे.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेनं विधानसभेसाठी मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत तब्बल 138 उमेदवारांची घोषणा केली. त्यात मुंबईसह सर्वच ठिकाणीही ताकद पणाला लावली आहे. मनसेनं एकीकडे स्वबळावर लढतानाच महायुतीशी 'मिले सूर मेरा तुम्हारा..'अशीही भूमिका ठेवली आहे.

अशातच अंबरनाथ मात्र मनसेचा नेत्यानं आपली दोस्तीचा वादा निभावण्यासाठी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार करणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह मनसेतही (MNS) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार व उमेदवार राजू पाटील (Raju Patil) यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार असे सूतोवाच अंबरनाथ येथे दिले आहेत. अंबरनाथ येथे गेले काही दिवस मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पक्षाचा आदेश आल्यावर पुढे पाहू असे म्हणत आमदार पाटील यांनी आताच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारास घाम फोडत मित्राला दोस्तीचा वादा दिला आहे. तर मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी दिली आहे

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Solapur Politic's : देवेंद्र फडणवीसांना भेटणारा सोलापुरातील काँग्रेसचा ‘तो’ नेता कोण?

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार तथा उमेदवार राजू पाटील हे शुक्रवारी (ता.1) दिवाळीच्या निमित्ताने अंबरनाथ येथे मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी मनसेने शिंदे गटास मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून विधानसभा निवडणूकित शिंदे गट कल्याण ग्रामीणमध्ये आमदार पाटील यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र, शिंदे गटाने येथे राजेश मोरे यांना तिकीट देत राजू पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये काहीशी नाराजी आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Amit Thackeray : अमित ठाकरेंनी सरवणकरांवर सोडले पहिले ‘रॉकेट’; आता माहिमचे रण पेटले...

'कल्याण ग्रामीण'मध्ये शिंदे गटाने सहकार्य न केल्याने याचा वचपा अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत काढण्याचा विचार मनसैनिकांनी केला आहे. शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार अंबरनाथ मनसैनिकांनी केला आहे.

आमदार पाटील म्हणाले, अंबरनाथ येथे दीपोत्सवचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मी इथे आलेलो आहे. माझे मित्र राजेश वानखेडे हे देखील येथे आले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तिथे आमचा उमेदवार नाही आणि ते माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा दिल्या.

दोस्ती निभावणार का याविषयी बोलताना आमदार पाटील म्हणाले, दोस्ती आणि राजकारण यात फरक असतो. येथे आमचा उमेदवार नाही, मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करेल.

लोकसभा निवडणुकीत मी मैत्री नाही निभावली. माझा मैत्री वगैरे असं काही विषय नव्हता. राज ठाकरे यांचा आदेश होता, त्यामुळे प्रामाणिकपणे आम्ही सहकार्य केलं. सहाही विधानसभेमध्ये जसं निभवलं तसं मी निभावलं. कोणत्या अटी-शर्थीवर केलेली ती मदत नव्हती. तो फक्त राजसाहेबांचा आदेश होता.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Omraje Nimbalkar: ठाकरे 'रॉकेट', पवार 'सुतळी बॉम्ब' तर शिंदे, फडणवीस हे...; ओमराजेंकडून नेत्यांना फटाक्यांची उपमा

शिवडीला त्यांना उमेदवार सापडला नाही, म्हणून त्यांनी दिला नसेल. मात्र, इतर ठिकाणी आमच्याविरोधात त्यांनी उमेदवार दिलेला आहे. त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे त्यांना माहिती, माझ्या पक्षाची ध्येय धोरणे आणि आदेश मला माहितीये. आम्ही त्याचे पालन करतोय. अंबरनाथ पुरतं बोलायचं झालं, तर इथे आमचा उमेदवार नाही. अजून साहेबांचे स्पष्ट आदेश आलेले नाही. राजेश माझे मित्र आहेत. मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार, पण पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं ते पक्ष म्हणून आम्ही ठरवू असे सांगितले.

याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता "सर्व मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील याची मला खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या भेटीमुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com