Omraje Nimbalkar: ठाकरे 'रॉकेट', पवार 'सुतळी बॉम्ब' तर शिंदे, फडणवीस हे...; ओमराजेंकडून नेत्यांना फटाक्यांची उपमा

Maharashtra Politics : आरोप- प्रत्यारोपांनी दिवसागणिक राजकीय वातावरण तापू लागले असतानाच दुसरीकडे धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी राजकीय आताषबाजी केली आहे.
Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil, Eknath Shinde
Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राजकीय पक्ष आणि नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे दिवाळीची धामधूमही जोरात आहे.

आरोप- प्रत्यारोपांनी दिवसागणिक राजकीय वातावरण तापू लागले असतानाच दुसरीकडे धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी राजकीय आताषबाजी केली आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष सामोरे जात आहे.

या निवडणुकीसाठी ठाकरेंनी आपले उमेदवारही दिले असून प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फौज उभी केली आहे. ओमराजेंचं ठाकरेंच्या शिवसेनेत वजन वाढल्याचे दिसून येत असून त्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil, Eknath Shinde
Amit Thackeray : अमित ठाकरेंनी सरवणकरांवर सोडले पहिले ‘रॉकेट’; आता माहिमचे रण पेटले...

ओमराजे निंबाळकरांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संवाद साधताना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना विविध फटाक्यांची उपमा दिली. त्यात त्यांच्या पक्षाचेप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, युवासेनेचे आदित्य ठाकरे,तानाजी सावंत,त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे हे रॉकेट तर आदित्य ठाकरे डबल धमाका आहेत. तसेच शरद पवार सुतळी बॉम्ब आणि राहुल गांधी हे लक्ष्मी तोटा ओरिजनल आवाज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil, Eknath Shinde
BJP Politics : 'मतांसाठी धर्म बदलता की काय?', उद्धव ठाकरेंना भाजपने खिंडीत गाठले

यावेळी त्यांनी धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना नागगोळी म्हटलं.ते म्हणाले, नागगोळीमुळे हातही काळा होतो अन् जमिनही असा चिमटाही खासदार ओमराजे यांनी सावंत यांना काढला.

तर त्यांचे पारंपारिक कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार राणा जगजितसिंह पाटलांना भुई चक्कर म्हणून संबोधलं.भाजप नेते किरीट सोमय्या यांना ओमराजे यांनी भुंगा फटाका म्हणाले.

Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil, Eknath Shinde
Harshvardhan Jadhav : 'घर फोडलं, पत्नीला विरोधात उभं केलं, दिवाळी साजरी करायला कोणी नाही', हर्षवर्धन जाधव भावूक

शरद पवारांना सुतळी बॉम्ब संबोधताना ओमराजे म्हणाले, सुतळी बॉम्बचा आवाज मोठा असतो, या आवाजाला सगळेचजण घाबरुन असतात.याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रॉकेट म्हटलं.ते अगदी सरळमार्गी आहे, जे बोललंय ते करतात. जे केलंय तेच सांगतात. रॉकेटकडे बघितलं की, उद्धवसाहेबांची आठवण होते असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे फुसका फटाका अन् कपटी फटाका अमित शाह यांना म्हणता येईल. देवेंद्र फडणवीस यांनासुध्दा कपटी फटाका म्हणणं लागू होईल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार ओमराजे यांनी निंबाळकर सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com