Solapur Politic's : देवेंद्र फडणवीसांना भेटणारा सोलापुरातील काँग्रेसचा ‘तो’ नेता कोण?

Congress Leader Meet Devendra Fadnavis : सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दोन विद्यमान आमदारांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 November : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील अकरांपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रबळ बंडोबांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. विशेषतः सोलापूर दक्षिण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्यासह आघाडीतील तुल्यबळ नेत्यांचे कडवे आव्हान आहे.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील एक ‘बहुचर्चित नेता’ नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून फडणवीसांना भेटणारा तो काँग्रेसचा नेता कोण?, अशी चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून (Solapur South Constituency) काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ उद्योजक महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे इच्छुक होते. तसेच, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांचेही नाव चर्चेत होते. काँग्रेसमधील तिकिटासाठीची संभाव्य स्पर्धा लक्षात घेऊन कागनुरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी मिळविली आहे.

माजी आमदार दिलीप माने यांचे नाव काँग्रेस (Congress) उमेदवारांच्या यादीत होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांना काँग्रेसकडून एबी फार्मच देण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी आमदार माने हे प्रचंड संतप्त झाले आहेत, त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरला आहे. बाबा मिस्त्री यांनी प्रहार संघटनेकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : बारामतीतून यंदा निवडणुकीला उभं राहणार नव्हतो, तीन ठिकाणांहून ऑफर होती; अजितदादांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांना सुमारे दहा हजारांचे मताधिक्क्य होते. त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्यासह दिलीप माने, धर्मराज काडादी या मातब्बर नेत्यांचेही आव्हान माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यापुढे आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही फोडाफोडाचे राजकारण होताना दिसत आहे.

दक्षिण सोलापूरमधील काँग्रेसचा एक नेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गुरुवारी (ता. 31 ऑक्टोबर) भेटल्याची चर्चा आहे. संबंधित नेत्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतही काम केले आहे. या भेटीसाठी दोन विद्यमान आमदारांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. एकीकडे महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसला भेटला नसल्याने काँंग्रेस नेते अगोदरच चिडले आहेत. त्यातच काँग्रेसचा एक नेता थेट फडणवीसांना भेटल्याने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis
Jayshri Jadhav : शिवसेनेकडे मी उमेदवारी मागितली, पण मला दुसऱ्याचाच अर्ज भरायला बोलावलं; जयश्री जाधवांनी सांगितली आपबित्ती

उमदेवारी अर्ज माघारी घेण्याच्या काही दिवस अगोदरच ही भेट झाल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेसचा तो नेता कोण, असा सवाल विचारला जात आहे. त्यातूच भाजपला अजूनही पराभाची भीती आहे का, अशीही चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेत काम केलेले दक्षिण सोलापुरात तीन नेते आहेत. त्यातील कोणता नेता फडणवीसांना भेटला, असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com