Worli Hit And Run Case : पुरावे समोर ठेवताच मिहीर पोपटासारखे बोलायला लागला, 'हो मीच...'

Mihir Shah Confessed Crime to Police : मिहीर शाह याच्या वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी होते. मात्र, या घटनेनंतर शिंदे गटाकडून त्यांची उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Worali Hit and run - Mihir Shah
Worali Hit and run - Mihir ShahSarkarnama

Mumbai Hit And Run Case Update : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील आरोप मिहीर शाह याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पोलिस तपासात मिहीर सहकार्य करत नव्हता. अपघातानंतर ओळखू येऊ नये म्हणून मिहीरने केस आणि दाढी देखील कापली. दारुच्या नशेत गाडी चालवत नव्हते म्हणणाऱ्या मिहीरच्या समोर पोलिसांनी पुरावे ठेवले असता तो पोपटासारखा बोलू लागला.

पुराव समोर ठेवताच मिहीर म्हणाला, 'हो मी नशेत होतो. अपघातानंतर घाबरल्याने मी पळ काढला.'अपघातानंतर आपण कुठे गेलो याची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली. मिहीर हा तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी त्याच्यासमोर सीसीटीव्ही आणि अन्य पुरावे त्याच्यासमोर ठेवले.

मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना Shivsena शिंदे गटाचे पदाधिकारी होते. मात्र, या घटनेनंतर शिंदे गटाकडून त्यांची उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषीवर कडक करावाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Worali Hit and run - Mihir Shah
Jayant Patil : दिवा विझताना जास्त फडफडतो...तशी महायुती सरकारची सध्याची अवस्था : जयंत पाटील यांची टीका

विरोधक आक्रमक

वरळीतील अपघात प्रकरणात विधिमंडळात विरोध आक्रमक झाले होते. आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांना चॅलेंज देत मिहीर शाह याचे घर बुलडोझरने पाठणार का? अशी विचारणा केली. तर, काँग्रेसचे Congress आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

अहवालाची प्रतीक्षा

मिहिर शाह आणि बिडावत हे दारुच्या नशेत होते की नाही? याचा अहवाल अजून पोलिसांना मिळालेला नाही. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला अधिक गती येईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडे मिहीर याला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले जात आहे.

Worali Hit and run - Mihir Shah
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या मतदारसंघातील रस्त्यांचा मार्ग झाला मोकळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com