

MIM Nagpur: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकीत पाहायला मिळाले. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात अर्थात नागपूरच्या महापालिकेत एमआयएमचे चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळं नागपूरमध्ये हिंदू आणि मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं पाहायला मिळालं आहे. नागपूरचा नेमका निकाल कसा आहे जाणून घेऊयात.
नागपूर महापालिकेतील १५१ जागांपैकी सर्वाधिक १०३ जागा भाजपला, काँग्रेस ३१, एमआयएम ७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळं इथं भाजपनं खरंतर क्लीनस्वीप दिला असून तीन आकडी जागा मिळवून आपलं वर्चस्व राखलं आहे. पण एमआयएमनं जिंकलेल्या ७ जागांची देखील चर्चा सुरु आहे. नागपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. तसंच दीक्षाभूमी देखील नागपूर इथेच आहे त्यामुळं बौद्ध समाजाचं देखील या शहरात मोठी संख्या आहे. त्याचा सहाजिकच फायदा हा काँग्रेसला झालेला दिसतो. पण इथल्या मुस्लिम लोकसंख्येनं एमआयएमवर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीचं असं आहे बलाबल...
भाजप - 103
शिवसेना - 02
राष्ट्रवादी - 01
शिवसेना (ठाकरे) - 02
काँग्रेस - 31
मनसे - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
MIM - 07
मुस्लीम लीग - 04
एकुण जागा- 151
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.