
Nagpur News: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची सध्या जोरात तयार सुरू झाली आहे. नव्याने मतदान नोंदणीला प्रारंभ झाला आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी तर भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नावे निश्चित केले आहेत.
दोन्ही उमेदवारांनी प्रचार कार्यालये उघडली आहेत. या लढतीत रिपब्लिकन पार्टीची भूमिका यापूर्वी महत्त्वाची राहिली आहे. रिपाइं विचाराचा उमेदवार आजवर निवडून आला नसला तरी मतविभाजनाने अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या विरोधात लढताना तब्बल २० हजार मते घेतली होती.
त्यामुळे आंबेडकरी जनतेची पहिली पसंती गजभिये हेच आहेत. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता लढू एकीनेच अशी घोषणा देणाऱ्या युवा ग्रॅज्युएट फोरमला मोठा धक्का बसला आहे. प्रशासनातून राजकारणात आलले किशोर गजभिये यांनी सर्वप्रथम पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली होती.
२०१४च्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी तर काँग्रेसचे बबनराव तायवाडे असे दोन दिग्गज उमेदवार रिंगणात होते. गजभिये यांच्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. तायवाडे यांना २० हजार ५०० तर गजभिये यांना २० हजार मते पडली. यात गडकरी हे निवडून आले होते. त्यानंतर गजभिये यांना बसपाने उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. बसपाचा हत्ती नागपूर शहरात खाते उघडणार असेच चित्र निर्माण झाले होते. या अटीतटीच्या निवडणुकचा तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांना पराभवाचा धक्का बसला. गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
बसपा आणि काँग्रेसच्या लढतीत भाजपचे मिलिंद माने निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये आलेल्या गजभिये यांना रामटेक लोकसभा मतदारसंघात वेळेवर निवडणूक लढण्यास पाठवण्यात आले. पराभव झाल्यनंतरही तुम्हीचे पुढचे उमेदवार असे आश्वासन देऊन काँग्रेसने त्यांना मतदारसंघाच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. पाच वर्षानंतर सर्वच राजकीय समीकरणे बदलली. महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांनी परस्पर रामटेकचा उमेदवार घोषित केला.
त्यांच्या आग्रहापुढे कोणाचे काही चालले नाही. त्यामुळे गजभिये यांनी बंडखोरी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र दोन बलाढ्य पक्षाच्या लढाईत अपण म्हणून लढणाऱ्या गजभिये यांचा टिकाव लागला नाही. काँग्रेसची धरसोड वृत्ती आणि दगाबाजीच्या राजकारणाला कंटाळून गजभिये यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवा ग्रॅज्युएट फोरमने त्यांनीच पदवीधरची निवडणूक लढावी असा आग्रह केला आहे. मात्र चार निवडणूक लढल्या. होता नव्हता जवळचा सर्व पैसा संपला. त्यामुळे पदवीधरची निवडणूक लढण्यास गजभिये यांनी नकार कळवला असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. असे असले तरी पदवीधरची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेचा उमेदवाराला आपण मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.