Nagpur News: प्रस्थापितांना पक्षाअंतर्गत विरोधकांशी लढावे लागणार; 20 मतदारसंघात बिग फाईट

Nagpur Zilla Parishad election reservation announced:अनेकांचे गट खुले झाले असल्याने दावेदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रस्थापित सदस्यांना आधी पक्षांतर्गत विरोधकांसोबत लढावे लागणार आहे.
Nagpur ZP News
Nagpur ZP NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आजी-माजी सुमारे २० दिग्गज नेत्यांना फटाके लावल्या जात आहे. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर जवळपास लढती स्पष्ट झाल्या आहेत. ५७ सर्कलपैकी २० मतदारसंघात बिग फाईट होणार आहे. अनेकांचे गट खुले झाले असल्याने दावेदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रस्थापित सदस्यांना आधी पक्षांतर्गत विरोधकांसोबत लढावे लागणार आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, भाजपचे माजी गटनेते अनिल निधान, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची नावे आरक्षमामुळे निवडणुकीतून बाद झाली आहेत. माजी उपनेते व्यंकट कारेमोरे यांना आरक्षणाने तारले़ आहे. ते पारशिवनी तालुक्यातील टेकाडी(को.ख.) येथून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे सर्कल आरक्षित आहे. येथून काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांना मैदानात उतरविल्यास चुरशीची लढत होईल. तसेच कामगार नेते शिवपाल यादव, गज्जू यादव यांचाही या सर्कलकडे मोर्चा राहील, असे दिसून येते. केळवदमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

सुमित्रा मनोहर कुंभारे येथून निवडून येत उपाध्यक्ष झाल्या होत्या. भाजप त्यांना पुन्हा संधी देणार आहे. मात्र काँग्रेसच्या नेते सुनील केदार यांच्या रोषाला यावेळी त्यांना सामोरे जावे लागणार आहे. हे आपला उमेदवार तगडा देऊन वचपा काढण्याचा प्रयत्न करतील. यामुळे भाजप आणि काँग्रेससाठी ही लढत प्रतिष्ठेची राहणार आहे. पाटणसावंगी सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. माजी मंत्री सुनील केदारांचे हे होमटाउन आहे. येथील निवडणूक रंगतदार होईल़ याशिवाय, गोंडेगाव, वडंबा, नगरधन, धानला, तारसा, वेलतूर, कोराडी, वडोदा,भोकारा, धापेवाडा, रिधोरा, रायपूर, बेला व सिर्सी या सर्कलमधील निवडणुका अत्यंत लक्षवेधक ठरणार आहेत.

कामठी तालुक्यातील वडोदा हे सर्कल सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे यांची तयारी या सर्कलमधून सुरू आहे. खुल्या गटासाठी हे सर्कल असल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांना येथे संधी आहे. त्यामुळे त्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. पक्षाने उमेदवारी दिली तरी त्यांना अंतर्गत विरोधाचा फटका बसून त्यांचा पराभव होण्याचे संकेत आहेत.

Nagpur ZP News
Mamata Banerjee Vs PM Modi: पुराच्या पाण्याला संघर्षाची ‘धार’; निवडणुकीच्या तोंडावर ममतादीदी मोदींना पकडणार कोंडीत

माजी सभापती उज्ज्वला बोढारे यांचा खडकी म्हणजे सावंगी देवळी राखीव झाला आहे. यामुळे त्या रायपूरमध्ये नशीब आजमावू शकतात. मात्र, त्यांचा येथे विरोध होऊ शक्यतो. वारंवार सर्कल बदलून निवडून येण्याची परंपरा यावेळी खंडित होण्याची चर्चा आहे. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. आता त्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातून त्यांचा अंतर्गत विरोध होऊ शकतो.

माजी आमदार टेकचंद सावरकर व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांचे सर्कल धानला आहे. या दोघांचेही होमटाउन सुद्धा आहे. हे सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सध्या भाजपकडे अध्यक्षपदाचा चेहरा नाही. त्यामुळे टेकचंद सावरकर यांना ते धानल्यातून उतरविण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसने या दोघांना एकमेकांविरुद्ध लढविल्यास ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतील लढत असेल.

जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे यांची सिर्सी गट राखीव झाला आहे. यामुळे त्यांना दुसऱ्या गटातून लढावे लागणार आहे. बेला खुल्या प्रवर्गासाठी आहे. पक्ष विचार करू शकतो. मात्र, अंतर्गत राजकारणाची फटका बसण्याची शक्यता आहे. यातून ते पंचायत समिती गणातून निवडणूक लढू शकतात. पंचायत समिती सभापती पद त्यांच्याकडे जाण्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com