Bjp News : एकनाथ शिंदेंना बाजुला सारून भाजपचा स्वबळाचा फॉर्म्युला? अमित साटम लागले कामाला, रणनीती ठरली!

Amit Satam BJP role News : एकीकडे भाजपने महायुतीमध्ये एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी दुसरीकडे स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून हे पद काढून आमदार अमित साटम यांच्याकडे पदभार सोपवला आहे. त्यानंतर नव्या दमाच्या साटम यांनी एकानंतर एक कोअर टीमच्या बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामाध्यमातून ते निवडणुकीबाबत चाचपणी करीत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपने महायुतीमध्ये एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी दुसरीकडे स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः येत्या काळात अमित साटम यांच्या नेतृत्वाखालील बैठका म्हणजे भाजपची एक 'प्लॅन बी' रणनीती असू शकते. महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण झाल्यास किंवा त्यांना अपेक्षित जागा न मिळाल्यास, भाजप स्वबळावर लढण्यास तयार आहे, असा स्पष्ट संदेश यातून दिला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असेलल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

Mahayuti Government
Shivsene : ठाकरे-शिंदे एकत्र येणार; संजय शिरसाट काय बोलून गेले?

भाजपची स्वबळाची चाचपणी

वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही. तर दुसरीकडे या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाची कामगिरी भाजपच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही, असे मानले जाते. यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर अधिक जागा जिंकू शकतो का? याची चाचपणी गेल्या काही दिवसापासून करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्यांना असे वाटत असावे की महायुतीमध्ये राहिल्याने त्यांच्या पारंपरिक जागांवरही फटका बसू शकतो, कारण काही ठिकाणी मित्रपक्षांविरोधात नाराजी आहे.

Mahayuti Government
BJP Vs OBC : भाजपनं डाव फिरवला, मराठ्यांसमोर ओबीसीचं उभं केलं नवं नेतृत्व? उपसमितीत बावनकुळेंकडे मोठी तर, भुजबळांकडे 'ही' जबाबदारी?

भाजपची नवी टीम लागली कामाला

नव्याने निवडलेली भाजपची टीम आतापासूनच कामाला लागली आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखालील कोअर टीम प्रत्येक मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेत आहे. यामध्ये बूथ स्तरावरील व्यवस्था मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करणे यावर भर दिला जात आहे. त्यामुळे भाजपकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे.

Mahayuti Government
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदेंची ताकद? फडणवीसांना घेरायचा प्लॅन होता? जरांगेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

महायुतीतील जागावाटपासाठी दबावतंत्र

आगामी काळात होत असलेल्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये भाजप ही सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे, स्वबळावर लढण्याची तयारी दाखवून शिंदे आणि अजित पवार यांच्या गटावर जागावाटपासाठी दबाव आणणे हा एक उद्देश असू शकतो. ज्यामुळे जागावाटपात त्यांच्या बाजूने झुकता माप मिळेल.

Mahayuti Government
Manoj Jarange: शब्द पाळला नाही तर येत्या निवडणुकीत धुरळा उडवू : उपचारानंतर चार्ज होताच जरांगे पाटील पुन्हा मैदानात

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न

मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबई भाजपचे अध्यक्षपद हे तीन वेळा आमदार असलेल्या अमित साटम यांच्यासारख्या नेत्याला पुढे करून भाजप नेतृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ते विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जोमाने कामाला लागतील. भाजपला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश पोहोचवायचा आहे की पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे.

Mahayuti Government
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange : मराठा आंदोलकांचं किती होतं दडपण? शिर्डीत पोहोचताच, मंत्री विखेंकडून जरांगेंचं कौतुक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com