Rajabhau Waje Politics : प्रचार संपताच राजाभाऊ वाजे लागले कामाला; दफनविधीला हजेरी

Loksabha Election लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुस्तावले आहेत
Rajabhau Waje
Rajabhau Wajesarkarnama

Shivsena UBT News : लोकसभा निवडणूक मतदान दोन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते सध्या सुस्तावलेले आहेत. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. एरव्ही सामाजिक कार्यकर्ते आणि अपघात अथवा संकटात मदतीला जाणारे नेते, अशी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची ओळख आहे. ती त्यांनी अद्यापही कायम ठेवली आहे.

२० मे रोजी मतदान संपले. त्यानंतर बहुतांशी राजकीय पदाधिकारी शिन घालविण्यात व्यस्त आहेत. मात्र श्री. वाजे यांनी दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या समाज कार्याला सुरुवात केली आहे. गोसावीवाडी भागात ५ जणांचा भावली (इगतपुरी) धरणात बुडून मृत्यू झाला. यामध्ये मामासह चार चार अल्पवयीन भाचे होते. मामा अनिस अहमद शेख, अनिस दिलदार खान, नजिया इमरान खान, मिसवाह दिलदार खान आणि इकरा दिलदार खान यांचा समावेश आहे.

उपहारगृहात काम करणाऱ्या महिलेची ही मुले आहेत. या दुर्घटनेमुळे गोसावीवाडी भागात राहणाऱ्या या गरीब कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. आज राजाभाऊ वाजे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी संबंधितांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. सुमारे तासभर येथे थांबल्यानंतर श्री. वाजे संबंधितांच्या दफनविधीला सुद्धा उपस्थित राहिले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

श्री. वाजे वैद्यकीय मदतीसाठी परिचित आहेत. नाशिक शिर्डी महामार्गावर तसेच पुणे रस्त्यावर अपघात झाल्यास ते रुग्णवाहिकेसह तात्काळ पोहोचतात. त्यांचे कार्यकर्ते संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे मुंबईसह नाशिकच्या अनेक अपघातग्रस्तांना त्यांची मदत झाली आहे. लोकसभेची निवडणूक जिंकल्यास सार्वजनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार आणि सुधारणा यावर लक्ष अधिक देणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

Edited By : Umesh Bambare

Rajabhau Waje
Nashik Constituency : नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत ; सिन्नरमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com