KDMC Mayor Politics: निकालानंतर आठच दिवसांतच मनसेचा उद्धव ठाकरेंना गुलिगत धोका; एका रात्रीत शिंदेंना पाठिंबा? राज ठाकरेंच्या नेत्यानं सांगितलं कारण

MNS- Shivsena News: केडीएमसीत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक विजयी झाले. सत्तास्थापन करण्यासाठी 62 या बहुमताचा आकडा गाठणं गरजेचं आहे. पण निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती.
Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde
Raj-Uddhav Thackeray-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

KDMC Election 2026: मुंबईनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या निवडणूक म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे पाहण्यात आलं.या महापालिकेत निवडणुकीआधी आणि नंतर मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे.महापालिका निवडणुकीत एकत्र लढलेल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसेची युती निकालानंतर आठच दिवसांत फुटली आहे.मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत थेट उद्धव ठाकरेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेलाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीत पहिली फूट पडली आहे. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचे नवनिर्वाचित नगरसेवक फोडण्यासाठी मोठी ताकद लावली होती. पण यानंतर भाजपला धक्का देत शिंदेंनी केडीएमसीत शिवसेनेचाच महापौर बसवण्यासाठी जोर लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी थेट मनसेच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करण्यासाठी मोठं पाऊल टाकलं आहे. जास्त जागा निवडून येऊनही तिथे शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं जाहीर पाठिंबा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.यावर आता कल्याण डोंबिवलीचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, आमच्या शहराच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच महापालिकेच्या राजकारणात घोडेबाजार होऊ नये,अशी प्रामाणिक इच्छा आमची होती, असंही त्यांनी म्हटलं.

राजू पाटील म्हणाले,सत्तेत राहून जनतेची कामे होणे जास्त महत्त्वाचे आहे.याचवेळी त्यांनी निवडणूक निकालानंतर नगरसेवक गायब होण्याचे सुरू असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा, याचे पूर्ण स्वातंत्र्य राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना दिले होते. पक्षहित आणि स्थानिक राजकारण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याही भूमिकाही देशपांडे यांनी म्हटलं आहे. निवडणुका एकत्र लढल्या असल्या तरी कल्याण डोंबिवली शहराचा विकास आणि नगरसेवकांचे हित लक्षात घेऊनच हा पाठिंबा दिल्याचंही देशपांडे यांनी सांगितलं.

Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde
Jalgaon EVM Controvercy : अपक्ष उमेदवाराला शुन्य मतदान, EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल, पण सत्य मात्र वेगळंच...

तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही कल्याण डोंबिवलीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे युतीवर मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोकं असतात,ते आघाड्या-युत्या करत असतात. निशाणीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात,माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत, त्यांनी इंटर्नल ॲडजस्टमेंट केली असावी,सगळीकडे असंच चित्र दिसत असल्याची बाबही नांदगावकर यांनी सांगितली.

तसेच कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेचं बिनसलं असावं,त्यामुळे तडजोडी झाल्या असाव्यात. काहीतरी घडलं असेल त्यामुळे हे होत असेल.काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात, तेव्हा काही बोलायच्या नसतात. वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हाही भाजपनं शतप्रतिशत नारा त्यांनी दिला होता, अशात अनेक पक्ष हा नारा देतात. आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही बिनसले असेल तर माहिती नाही. असेही नांदगावकर यांनी म्हटले.

Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde
Jalgaon EVM Controvercy : अपक्ष उमेदवाराला शुन्य मतदान, EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल, पण सत्य मात्र वेगळंच...

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी सर्वात मोठं विधान करतानाच राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं. कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी सकारात्मक विचार करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचंही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबईच्या महापौराबाबत नांदगावकर यांनी उद्धव साहेब बोलून गेले,पण देवाच्या मनात या वक्तव्याचे तुम्ही वेगवेगळे अर्थ लावल्याची टीकाही त्यांनी केली.

याचदरम्यान, बाळा नांदगावकर यांनी उद्धव साहेब आणि राज ठाकरे राजकारणात नवीन नाहीत, राजकारणात कधी काहीही होऊ शकतं,कोणीही मित्र-शत्रू नसतो.कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक बघून चालत नाही.आमच्या पक्षाचे नुकसान अधिक झाले हे मान्य करतो. मात्र,तडजोडी होत असतात, भविष्यात कोण कोणाची मदत घेईल,काहीही होऊ शकतं असे म्हणत राज्याच्या राजकारणातील मनसेच्या पुढच्या वाटचालीचे नवे संकेतही नांदगावकर यांनी दिले.

Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde
BMC Election : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरला! उद्धव ठाकरेंनी बलाढ्य सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणण्यासाठी माजी महापौरांकडे दिली मोठी जबाबदारी

केडीएमसीत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक विजयी झाले. सत्तास्थापन करण्यासाठी 62 या बहुमताचा आकडा गाठणं गरजेचं आहे. पण निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com