Thane Mayor : महापौरपदाच्या रेसमधील शिवसेनेचा नगरसेवक अडचणीत? पहिल्या पत्नीची आयोगाकडे धाव

Ganesh Kamble controversy : महापौरपदाच्या शर्यतीत असलेले शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे पहिल्या पत्नीच्या तक्रारीमुळे अडचणीत आले असून प्रतिज्ञापत्रातील माहिती लपविल्याचा आरोप झाल्याने राजकीय वाद वाढला आहे.
Thane Shiv Sena corporator Ganesh Kamble, a mayoral aspirant, faces legal trouble after his first wife filed a complaint alleging false disclosures in election nomination documents.
Thane Shiv Sena corporator Ganesh Kamble, a mayoral aspirant, faces legal trouble after his first wife filed a complaint alleging false disclosures in election nomination documents.Sarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Corporation News : शिवसेनेचे नगरसेवक आणि महापौरपदाच्या शर्यतीत असलेले गणेश कांबळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीने आपणच त्यांची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कांबळे यांनी निवडणूक नामांकनात 2 पत्नी आणि 3 मुलांची माहिती लपवली, तसेच गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दडपल्याचा आरोप केला आहे.

प्रभाग क्रमांक 9-अ मधून गणेश कांबळे निवडून आले आहेत. यंदा पालिकेतील महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने कांबळे यांचे नाव आघाडीवर होते; मात्र आता वैयक्तिक आरोपांमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत गणेश कांबळे यांच्यशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

आपला 2013 मध्ये प्रेमविवाह झाला असून, दोघांना दोन मुले असून 2019 पासून दोघे वेगवेगळे राहत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर 2021 मध्ये प्रिया उबाळे नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केल्याचा, तसेच 20 जून 2022 रोजी मुलगी झाल्याचा आरोप केला आहे. कांबळेंविरोधात विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केलेला नाही. असे तक्रारीत नमूद केले आहे.

Thane Shiv Sena corporator Ganesh Kamble, a mayoral aspirant, faces legal trouble after his first wife filed a complaint alleging false disclosures in election nomination documents.
Thane Mayor Election : भाजपचा ठाणे महापौर पदावर दावा, निरंजन डावखरेंच्या मागणीने शिवसेनेचे टेन्शन वाढले!

नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

कॅरोलिन कांबळे यांनी निवडणूक आयोग, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करत गणेश कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत कांबळे यांना महापौर बनवू नये, अशी विनंती केल्याचे सांगितले जाते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com