Vasai Political News : वसईत जनता दलाचे अस्तित्व पणाला ; कार्यकर्ते लागले समाजवादी पार्टीच्या कामाला...

Janata Dal Vs Samajwadi Party in Vasai : देवेगौडांच्या भूमिकेमुळे समाजवाद व धर्मनिरपेक्षता जपणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...
Samajwadi Party
Samajwadi PartySarkarnama
Published on
Updated on

Vasai Political News : जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा पिता पुत्राने जाहीरपणे भाजपशी युती केल्याने देशभर निषेध आणि विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील जनता दलातील कार्यकर्ते सुध्दा नाराज झाले आहेत. यातूनच वसईतील कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

त्यामुळे जनता दलाचे (Janata Dal) अस्तित्व पणाला लागले असून कार्यकर्ते समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) कामाला लागले असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी विचारसरणी व धर्मनिरपेक्षता हे तत्व सोडून हिंदुत्ववादी धर्म असलेल्या भारतीय जनता पार्टी (BJP) सोबत जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा यांनी युती केली.

Samajwadi Party
Manoj Jarange: 'येवल्याचा येडपट' उल्लेख करत जरांगेंनी भुजबळांवर डागली तोफ ; भुजबळांना कुणी मंत्री केलं?

हा निर्णय जनता दलातील समाजवाद व धर्मनिरपेक्षता जपणाऱ्या कार्यकर्त्यांना आवडला नाही. त्यामुळे निषेध आणि विरोध सुरू झाल्याने कार्यकर्ते सुध्दा नाराज झाले. गेल्या अनेक वर्षापासून वसई (Vasai) तील जनता ही समाजवादी विचारसरणी आणि धर्मनिरपेक्षता जपत आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवंगत आमदार स. गो. वर्टी, दिवंगत आमदार पंढरीनाथ चौधरी, माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, ठाणे जिल्हा जनता दलाचे दिवंगत विलास विचारे, जनता दलाचे माजी उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो, सहकारातील समाजवादी विचाराचे दिवंगत म. वि. कुलकर्णी, पालघर तालुक्याचे माजी आमदार दिवंगत नवनीतभाई शहा आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत वासुदेव वर्तक यांनी समाजवादी विचारसरणी रूजवली, जपली आणि वाढवली.

अशा नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून शेकडो कार्यकर्ते तयार झाले. अनेक आंदोलने, बंद, धरणे, रास्ता रोको, रेल रोको, महागाई विरुध्द आंदोलने त्यांनी यशस्वी केली होती. त्यामुळे वसईत जनता दलाचे मोठे अस्तित्व होते. परंतु आता जनता दलातील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने जनता दलाचे अस्तित्व वसईमध्ये पणाला लागले आहे. समाजवादी पक्षात दाखल झाल्यावर वसईतील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही समाजवादी पक्षाने जाहीर केल्या आहेत.

यात मनवेल तुस्कानो यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, जितेंद्र सत्पाळकर कार्यकारिणी सदस्य, रघुनाथ कालभाटे चिटणीस वसई-विरार शहर, दिनेश सामंत उपाध्यक्ष वसई विभाग, प्रणिता जाधव महिला आघाडीप्रमुख, कुमार राऊत अध्यक्ष वसई-विरार शहर व सचिव महाराष्ट्र प्रदेश, अल्ताफ हुसेन महमद अध्यक्ष विरार विभाग, पायस मध्याहो उपाध्यक्ष वसई-विरार शहर यांचा समावेश करण्यात आला आहे.

(Edited by Amol Sutar)

Samajwadi Party
Pune Metro News : पुण्यातील 'हा' भाग देखील भुयारी मेट्रोने जोडला जाणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com