Virar News: वसई-विरार महापालिकेच्या गणेशोत्सवातील कामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गणेशोत्सवासाठी मंडप, विसर्जन व्यवस्था आणि अन्य कामे गैर हिंदू ठेकेदारांना देऊ नयेत, अशी मागणी भाजप नेत्याने आयुक्तांकडे केली आहे.पर्युषण पर्व काळात वसई-विरार पालिका हद्दीत मांस विक्री करू नये यावरून वाद सुरु असतानाच आता भाजपच्या नेत्याच्या या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणे आणि अन्य काम गैर हिंदू ठेकेदारांना देऊ नये, अशी मागणी भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी पालिका आयुक्तांना केली आहे. गैरहिंदुमुळे हिंदू सरांच्या धर्माचे पावित्र्य नष्ट होते आता दावा शेळके यांनी पत्रात केला आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे आयुक्तांनी मात्र आम्ही नियमाप्रमाणेच काम देऊ असे स्पष्ट केले आहे.
पर्युषण पर्व काळात वसई-विरार पालिका हद्दीत मांस विक्री करू नये यावरून वाद सुरु असतानाच आता भाजपच्या नेत्याच्या या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून महापालिका त्याच्या आयोजन आमच्या तयारीमध्ये लागली आहे. या काळात महापालिका गणपती विसर्जनासाठी मंडप , कृत्रिम तलाव उभारते, विसर्जन मार्गावर रोषणाई करते. वाहतूक आणि इतर व्यवस्था करत असते. याचे काम गैर हिंदू ठेकेदाराना देऊ नये, अशी मागणी वसई विरार महापालिकेचे भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना केली आहे.
बहुतांश ठेकेदार हे गैर हिंदू आहेत. आमच्या सणात ते मांसाहार करून येतात आणि आमच्या सणाचे पवित्र नष्ट होते, असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे शेळके यांनी सांगितले. कुठेही आर्थिक नुकसान झाले तरी चालेल मात्र गैर हिंदूंना महापालिकेच्या मनसेच्या कामाचा ठेका देऊ नये, अशी मागणी पोळके यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.
कुणी काहीही मागणी केली तरी आम्ही नियमाप्रमाणेच कामे देऊ, कुठलाही भेदभाव केला जाणार नाही.
पृथ्वीराज बी पी , आयुक्त,वसई विरार महानगरपालिका
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.