Nagpur Election: भाजपचा बंडखोरांना मोठा झटका! तब्बल 32 जण एकाचवेळी निलंबित

Nagpur Election: महापालिकेच्या तिकिटासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झुंबड उडाली होती. सुमारे दोन हजार जणांनी उमेदवारी मागितली होती.
Angry BJP workers protest outside party offices in Maharashtra after ticket denials, targeting MLAs and MPs amid chaos during municipal election nomination filing.
Angry BJP workers protest outside party offices in Maharashtra after ticket denials, targeting MLAs and MPs amid chaos during municipal election nomination filingSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Election: महापालिकेच्या तिकिटासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झुंबड उडाली होती. सुमारे दोन हजार जणांनी उमेदवारी मागितली होती यातून फक्त फक्त दीडशे जणांची निवड करताना नेत्यांची मोठी तारांबळ उडाली होती. नाराजी उद्‍भवणारच याची कल्पना आल्याने अर्ज भरेपर्यंत अधिकृत उमेदवारी नावे जाहीर करण्याचे भाजपने टाळले होते. त्यानंतरही अनेकांनी बंडाचे निशान फडकावले आहे. अशी एकूण ३२ जणांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून मोठा झटका दिला आहे.

Angry BJP workers protest outside party offices in Maharashtra after ticket denials, targeting MLAs and MPs amid chaos during municipal election nomination filing.
Ladki Bahin Yojana: E-KYC ची मुदत संपली! तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद

यात पाच वेळा नगरसेवक राहिलेले ज्येष्ठ नेते सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक भगवान मेंढे, माजी नगरसेवक दीपक चौधरी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी नगरसेविका नसिमाबानो आदींचा समावेश आहे. भाजपने निलंबनासह बंडखोरांना छुपी मदत करणारे, पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही कोणाची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे तिकीट नाकारल्याने नाराज असलेले व विरोधकांना मदत करणारे कार्यकर्ते घाबरले आहेत. विशेष म्हणजे २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपने अनेकांना निलंबित केले होते. वर्षभरानंतर सर्वांना पक्षात परत घेतले होते.

Angry BJP workers protest outside party offices in Maharashtra after ticket denials, targeting MLAs and MPs amid chaos during municipal election nomination filing.
Badlapur Politics : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची माघार, राष्ट्रवादीने गुलाल उधाळला; बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले

भाजपने निलंबित केलेल्यांमध्ये सुनीता महल्ले, देवराज वासनिक, नसिमाबानो, सचिन खोब्रागडे व सुरेश टेंभरे, महेन्द्र गुप्ता व पुष्पा किरपाने, रुणाल चौहान, सुनील अग्रवाल, विनायक डेहनकर, धीरज चव्हाण व अक्षय ठवकर, प्रकाश घाटे व पापा यादव, विशाल लारोकर, शुभम मौदेकर, सुलोचना कोवे व राकेश भनारकर, रविशंकर कुंभारे, दशरथ मस्के, आशिष भुते व नंदिनी भुते, टेकचंद सोनबोईर, नंदू अहिर, रेणू गेंडरे, शुभम पडोळे व राजू घोसे, सुनील मानापुरे, सोनाली घोडमारे, दीपक चौधरी, आसावरी कोठीवान व सुनील मानेकर यांचा समावेश आहे.

Angry BJP workers protest outside party offices in Maharashtra after ticket denials, targeting MLAs and MPs amid chaos during municipal election nomination filing.
Retired Justice Sandeep Shinde : मोठी बातमी : ‘मराठी-कुणबी’ समितीच्या अध्यक्षांची दुसऱ्या राज्यात लोकायुक्तपदी नियुक्ती, समितीचे काय होणार?

विशेष म्हणजे भाजपने पाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांचे तिकीट कापण्याचा इशारा यापूर्वीच दिला होता. तीन वर्षांच्या प्रशासकाच्या काळात आपले कार्यालय बंद करू नका, लोकांच्या संपर्कता राहा, त्यांच्या समस्या सोडवा अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. यावेळी उमेदवारी देताना भाजपने प्रत्येकाचा सर्वे केला होता. त्यातून उमेदवारांची निवड केली असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com