Raj Thackeray News: पोलिसांनी दखल न घेतल्याने राज ठाकरेंविरुध्द न्यायालयात तक्रार

Raj Thackeray Complaint Pimpri Court: रमजानच्या पवित्र महिन्यात देशभर दंगल भडकेल, असे भाषण केल्याचे त्यात म्हटले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pimpri Court: पिंपरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची मुंबईतील शिवाजी पार्क,दादर (पश्चिम)येथील सभा ही धार्मिक वाद निर्माण करणारी, दंगल भडकवणारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी पिंपरी चिंचवडमधील एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याने पिंपरी न्यायालयात खासगी तक्रारीव्दारे आज केली.

राज यांच्या या सभेनंतर वाकड येथील वाजीद रज्जाक सय्यद यांनी काल वाकड पोलिस ठाण्यात राज यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देत त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली होती. पण, पोलिसांनी त्याची दखलच न घेतल्याने त्यांनी अॅड. वाजेदखान बीडकर यांच्यामार्फत पिंपरी न्यायालयात आज धाव घेत खासगी तक्रार दिली. ती दाखल करून घेण्यात आली आहे.

Raj Thackeray
Sharad Pawar News: राहुल गांधींच्या शिक्षेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

राज यांनी आपल्या भाषणात माहिम (पश्चिम), मुंबई समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत दर्ग्याबाबत वक्तव्य केले होते. ते बांधकाम लगेच पाडून टाकण्यात आले.त्यावरून राज यांना फक्त मुस्लिमांचीच अनधिकृत बांधकामे आणि भोंगे दिसतात,असे सांगत त्यांना राज्यात दंगल घडवायची आहे,असे सय्यद हे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.

राज यांचे भाषण हे हिंदू आणि मुस्लिमांत धार्मिक वाद निर्माण करणारे असल्याचा दावा त्यांनी पोलीस आणि न्यायालयातील तक्रारीत केला आहे.आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राज यांनी हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण होऊन रमजानच्या पवित्र महिन्यात देशभर दंगल भडकेल, असे भाषण केल्याचे त्यात म्हटले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray News: धार्मिक भावना दुखावल्याचा राज ठाकरेंवर ठपका? ; पोलिसात तक्रार दाखल!

अशा प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातच नाही,तर बिहारसारख्या परराज्यातही गुन्हे दाखल असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणीही पुढे करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला राज ठाकरे हेच जबाबदार असतील,असे सय्यद यांनी आपल्या तक्रारीत शेवटी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com