PCMC Election 2025: काटेंसह अनेक माजी नगरसेवकांना करावी लागणार तडजोड! आरक्षणानं बदलली पिंपरी-चिंचवडची गणितं

PCMC Election 2025: कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी प्रभाग क्रमांक ३० मधील अ, ब, क आणि ड या चारही जागा वेगवेगळ्या संवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

PCMC Election 2025: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ११) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी प्रभाग क्रमांक ३० मधील अ, ब, क आणि ड या चारही जागा वेगवेगळ्या संवर्गासाठी आरक्षित झाल्या. त्यामुळं सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील पुरुषांना येथील निवडणुकीचे दरवाजे बंद झाले आहेत. अन्य ३२ पैकी ३१ प्रभागांमधील ‘ड’ क्रमांकाच्या जागा खुल्या आहेत. शिवाय, साधारण १० प्रभागांमध्ये २०१७-२०२२ या कालावधीतील २० माजी नगरसेवकांना तडजोड करावी लागणार आहे. काहींना घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार असल्याचे चित्र आहे.

PCMC
Nagpur Politics: दोन माजी उपमहापौर एकाच प्रभागात, काँग्रेससमोर तिकीट वाटपाची मोठी अडचण

लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठीचे आरक्षण प्रभाग तीसमध्ये निश्चित झाले होते. कारण, या प्रभागातील एससी आणि एसटी या दोन्ही संवर्गाची लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे निवडणूक अधिनियमानुसार, ‘अ’ जागा एससी संवर्गासाठी आणि ‘ब’ जागा एसटी संवर्गासाठी आरक्षित झाली होती. त्यातील महिलांसाठीच्या आरक्षणात ‘ब’ जागा एसटी संवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली. प्रभागातील ‘क’ जागा २७ टक्के आरक्षणानुसार ओबीसींसाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षित झाली. एससी, एसटी, ओबीसी संवर्ग आणि त्यांतील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्यानंतर खुल्या (सर्वसाधारण) गटातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात प्रभाग ३० मधील ‘ड’ जागा आरक्षित झाली. त्यामुळं प्रभागात ‘अ’ जागा एससी, ‘ब’ जागा एसटी महिला, ‘क’ जागा ओबीसी आणि ‘ड’ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून खुल्या प्रवर्गातील पुरुषांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे माजी नगरसेवक रोहित ऊर्फ अप्पा काटे, संजय ऊर्फ नाना काटे, राजेंद्र काटे यांना तडजोड करून स्वतःऐवजी घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल.

PCMC
Prashant Kishor : मोदींना केंद्रात सत्तेचा मार्ग दाखवणाऱ्या प्रशांत किशोर यांची जादू फेल! बिहारचे एक्झिट पोल काय सांगतात?

तडजोडीने साधावे लागणार गणित

एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागातून कोणत्या जागेवर लढावे याचे गणित स्पष्ट झाले. मात्र, २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये निवडून आलेल्यांपैकी काहींना या आरक्षणाचा फटका बसला आहे. नगरसदस्यपद (नगरसेवक किंवा नगरसेविका) आपल्या घरातच राहण्यासाठी त्यांना प्रतिस्पर्ध्यांशी तडजोड करून निवडणूक लढण्याचे गणित साधावे लागणार आहे, असे प्रभाग व जागा पुढीलप्रमाणे...

PCMC
Karuna Munde: "अचानक मी झोपेतून उठले अन् आचारसंहिता लागली"; करुणा मुंडेंनी का व्यक्त केलं आश्चर्य?

- प्रभाग चारमध्ये तीन जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यात एक एससी महिला, एक एसटी, एक ओबीसी महिला आरक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विकास डोळस यांना घरातील महिलेला प्राधान्य द्यावे लागेल.

- प्रभाग आठमध्ये एक जागा एससी, एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण महिला अशा तीन जागा आरक्षित झाल्या आहेत. गेल्या वेळच्या दोन नगरसेवकांपैकी विलास मडिगेरी किंवा विक्रांत लांडे यांना तडजोड करून महिलेला प्राधान्य द्यावे लागेल.

- प्रभाग १२ मध्ये एक जागा ओबीसी आणि दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे गतवेळचे विजेते पंकज भालेकर व प्रवीण भालेकर यांना तडजोड करून घरातील महिलेला उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी लागेल.

- प्रभाग २० मध्ये एक जागा एससी, एक जागा ओबीसी महिला आणि एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक योगेश बहल आणि श्याम लांडे यांना तडजोड करावी लागणार आहे व घरातील महिलेला उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी लागेल.

- प्रभाग २४ मधील म्हातोबानगर प्रभाग २५ ला जोडल्यामुळे गेल्या वेळचे एससी आरक्षण बदलून प्रभाग २४ मधील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि एक जागा ओबीसींसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन भोसले यांना खुल्या गटातून लढावे लागेल.

- प्रभाग २५ आणि प्रभाग २६ मध्ये अनुक्रमे माजी नगरसेवक राहुल कलाटे व मयूर कलाटे आणि संदीप कस्पटे यांना तडजोड करून

स्वतःऐवजी घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल.

- प्रभाग २९ मध्ये प्रत्येकी एक जागा एससी व एसटी महिलेसाठी आणि एक जागा ओबीसीसाठी राखीव झाल्याने माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांना खुल्या जागेवरून निवडणूक लढवावी लागेल किंवा घरातील महिलेला निवडणूक लढवावी लागेल.

- प्रभाग ३१ व ३२ मध्ये समान परिस्थिती आहे. प्रत्येकी एक जागा एससी महिलेसाठी, प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आणि प्रत्येकी एक जागा ओबीसींसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे एससी संवर्गातील लढतीसाठी माजी नगरसेवक अनुक्रमे अंबरनाथ कांबळे व संतोष कांबळे यांच्या घरातील महिलांना निवडणूक लढवावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com