Rohit Pawar : रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं; सुनेत्रा काकींविरोधात नव्हे, अजितदादांविरोधात बोलणार...

Ajit Pawar News : बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Political News : बारामती लोकसभेसाठी काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या राजकारणात नव्हत्या. बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी होणार आहे, म्हणून आम्ही अजितदादांविरोधातच बोलू, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील सदस्यांतच लढत होण्याची शक्यता आहे. यावेळेस खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले आहे.

ते म्हणाले, बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच, तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली आहे. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताईंविरुद्ध अजितदादा अशी लढत होणार आहे. त्यामुळे आम्ही अजितदादांविरोधात बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Rohit Pawar
Sharad Pawar News: बारामतीत सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत, शरद पवार बघा काय म्हणाले ? | Baramati |

बारामतीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरविले जाणार आहे. यावर रोहित पवार म्हणाले, याबाबत शरद पवारसाहेब म्हणतील तसं होणार आहे. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचं स्वागत करायला हवं. आमच्यासारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिरूर मतदारसंघाबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांना छेडले असता ते म्हणाले, मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. पण, आता कोल्हे विरोधात पार्थ पवारही असू शकतो.

मुळात अजितदादांना महायुतीत चार जागा मिळतील, त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही, असेही भाकीत त्यांनी केले. आजच्या सभेबाबत शरद पवारसाहेब काय बोलतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं आजच्या सभेत ते काय बोलतील याची उत्सुकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

Ajit Pawar, Rohit Pawar
Rohit Pawar News: 'बैलाकडे पाहून कळतं प्रामाणिक कसं राहावं, लोक आपल्या काकांनाही विसरतात; रोहितदादांचा रोख कुणाकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com