Pimpri-Chinchwad News : टीडीआर घोटाळा पालिका आयुक्तांवर शेकणार?

Ajitdada Chillange MP Kolhe: अजित पवार एखादं चॅलेंज देतो, तेव्हा ते जिंकूनच दाखवतो, अजितदादांनी खासदार कोल्हेंना पुन्हा ललकारले
PCMC News
PCMC NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत शेकडो कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला.त्याची दखल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली असून त्याप्रकरणी चौकशीचे संकेत त्यांनी सोमवारी (ता.२५) पिंपरी-चिंचवडमध्ये दिले. त्यामुळे हा घोटाळा आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्यावर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PCMC News
Kamal Khan Arrested : नरेंद्र मोदीजी, माझ्या जीवास धोका..मी मेलो तर..., अभिनेत्याची ट्विटरवरून साद

या टीडीआर घोटाळ्याची कागदपत्रे मागवल्याचे सांगत याप्रकरणी चौकशीचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच त्यात गडबड असेल,तर टीडीआर वितरण थांबवले जाईल,कारण पालिका आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय राज्य सरकारला थांबविण्याचा अधिकार आहे,असे ते म्हणाले.यासंदर्भात नगरविकास विभागातील सचिव दर्जाचे अधिकारी,काही रिटायर्ड अधिकारी यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी या प्रकरणात संशय घ्यायला जागा असल्याचे सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.परिणामी शेखरसिंह यांचा डीआर देण्याचा हा निर्णय राज्य सरकार फिरवून त्यात चौकशी लावण्याची शक्यता आहे.तसे झाले,तर आयुक्त अडचणीत येणार आहेत.

शिरुर लोकसभेला मी दिलेला उमेदवार निवडून आणणार असे अजित पवार यांनी आज पुण्यात सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) तेथील खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले. ते कोल्हेंनी लगेच नम्रपणे स्वीकारले.त्यावर चिंचवड येथे बोलताना अजितदादांनी कोल्हेंना पुन्हा ललकारले.मी एखादे चॅलेंज देतो,तेव्हा जिंकूनच दाखवतो हे लक्षात ठेवा.निकाल लागल्यावर ते कळेलच,असे ते म्हणाले.त्यासाठी शिरुरमधील सहा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करण्यास हडपसरपासून सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघात पाच वर्षे जनसंपर्क ठेवला नाही आणि आता लागलेत फिरायला,असा टोला त्यांनी कोल्हेंना लगावला.

PCMC News
Modi Goverment : मोदी सरकार करणार मोठी घोषणा; 48 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार !

उद्योगनगरीत जानेवारीत होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यासाठी अजितदादा शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील फकेबाजी केली.पक्षाचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मावळातून लोकसभेला इच्छूक असल्याची तयारी दाखवली.त्यावर बोलताना अशा भेटी राजकारणात होत असतात,असे सांगत त्याला महत्व देणे त्यांनी टाळले. निवडणुका आल्या की अशी उमेदवार चाचपणी होते,याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे आहे,असे सांगत वाघेरे यांची भेट घेतल्यावर अधिक सांगेन,असे ते म्हणाले.

PCMC News
Madhya Pradesh : मध्य प्रदेशात चौहान-शिंदे यांना झटका; मुख्यमंत्री मोहन यादवांच्या मंत्रिमंडळ विस्तारात...

शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल

चिंचवडमधील शंभरावे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला.यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल,राष्ट्रवादीचे (अजित पवार)शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नामाजी नगरसेवक नाना ऊर्फ विठ्ठल काटे, शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.या संमेलनासाठी दहा कोटी रुपये राज्य सरकारने दिले असून पुणे जिल्हा नियोजन समितीही २५ लाख देणार असल्याचे अजितदादांनी सांगितले.

(Edited By - Chaitanya Machale)

PCMC News
Pune Lok Sabha Constituency: सर्वसामान्यांशी घनिष्ठ संबंध असलेले काँग्रेसचे निष्ठावंत मोहन जोशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com