Political Horoscope: देशाच्या राजकारणात आश्चर्यकारक घटना, मोठे कायदे, विधेयके मंजूर होणार...

Rashi Bhavishaya : नवीन वर्ष कसं असणार ? जाणून घ्या सविस्तर...
Bhavishyanama 12.jpeg
Bhavishyanama 12.jpegSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

रविवार, ३० मार्च २०२५ रोजी हिंदू नववर्षाचा आरंभ होत असून, शालिवाहन शके १९४७ या नूतन संवत्सराचे नाव ‘विश्वावसू’ असे आहे. संवत्सराचा राजा व मंत्री सूर्य असून, कोषाधिप बुध, मेघाधिप रवी, खरिपाचा स्वामी बुध व रवी आहे. सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश २२ जून २०२५ रोजी, रविवारी होत असून, नीलक नावाचा मेघ व वसुकी नावाचा नाग आहे. यांचे मिश्र परिणाम होणार आहेत. या वर्षीचे पर्जन्यमान चांगले राहील. पिके चांगले येतील. लोक आनंदी राहतील. धनधान्य मुबलक होईल. लोकांमध्ये सुख-समाधान वाढेल.

खरिपाचा स्वामी बुध असल्याने लोक आनंदी राहतील, धान्याचे उत्पादन चांगले होईल, पाण्याची कमतरता राहणार नाही. संपत्तीत वाढ होईल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने उत्तरार्धात चांगला पाऊस होईल. रब्बीच्या पिकांचे उत्पादन चांगले होईल. रसेश शुक्र असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, मात्र जवस, मीठ, ऊस, तीळ यांचे उत्पादन कमी होईल.

नूतन संवत्सर आरंभ पत्रिकेत सिंह लग्न उदित असून, केंद्रस्थानी गुरू-शनी, हर्षल, लाभस्थानी मंगळ, तर अष्टमस्थानी रवी-चंद्र, शुक्र, बुध, राहू, नेपच्यून अशा सहा ग्रहांची गर्दी आहे. केंद्रातील गुरूमुळे नूतन संवत्सर देशासाठी प्रतिष्ठा वाढविणारे राहील. काही आश्चर्यकारक घटना देशाच्या राजकारणात (Politics) होण्याची शक्यता राहील.

Bhavishyanama 12.jpeg
Amit Shah: भाजपची केंद्रात पुढची किती वर्षे सत्ता राहणार ? अमित शाहांनी पाच-दहा नव्हे, तर सांगितला थेट 'हा' आकडा

निवडणुकांमध्ये सत्तांतरे होतील. नवीन वर्षात महत्त्वाचे कायदे, विधेयके मंजूर होतील. शत्रूराष्ट्रांवर विजय मिळेल. गुन्हेगार, अतिरेकी पकडले जातील. लष्कर, पोलिस, खेळाडू यांच्यासाठी नूतन वर्ष अनुकूल राहील. मोठ्या स्पर्धेमध्ये देशाला विजेतेपद मिळेल. निवडणुकांमध्ये सत्ताधारी युती, आघाडीला मोठे यश मिळेल. मात्र नेतृत्वबदल किंवा केंद्र-राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदल होतील.

अष्टमातील ग्रहांची गर्दी पूर, अतिवृष्टी, त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून हानी दर्शविते. तर विमान, जहाज दुर्घटना, बुडून होणारे मृत्यू, आत्महत्या, संसर्गजन्य विकार यांतून मोठी जीवितहानी संभवते. स्त्रीवर्ग, कलाकार, लेखक, साहित्यिक, पत्रकार, लहान मुले यांच्यासाठी नवीन वर्ष प्रतिकूल राहील. अफवा पसरविणे, अमली पदार्थाचे गुन्हे, सायबर क्राइम, फसवणूक, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. नवीन वर्ष चांगले जाण्यासाठी सूर्य उपासना व सद्गुरूंची उपासना फलदायी राहील. सर्ववाचकांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Bhavishyanama 12.jpeg
Trupti Desai On Dhananjay Munde : तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंना फटकारलं; म्हणाल्या, मुले चालतात,पत्नी का नाही?

साप्ताहिक राशिभविष्य

२९ मार्च ते ४ एप्रिल

मेष : नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठी खरेदी कराल. नवीन वर्षात परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. घर, वाहन, उंची वस्तूंची खरेदी होईल. मोठे कर्ज मंजूर होईल. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. नवीन पाहुणा घरी येईल. धनसंचय वाढेल. भावंडे, नातेवाइकांसाठी खर्च होतील.

वृषभ : वर्षाच्या सुरुवातीला मोठे लाभ होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. तरुणांचे विवाह जमतील. नवीन वर्षात धार्मिक मंगलकार्य घडतील. देवधर्म, तीर्थयात्रा कराल. परदेशगमन फायदेशीर होईल. .

मिथुन : वर्षाच्या सुरुवातीला नवीन नोकरी, व्यवसायाची संधी मिळेल. कामानिमित्त परदेशगमन होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा मिळेल. जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल.

कर्क : नवीन वर्षाची सुरुवात भाग्यकारक राहील. नवीन वर्षात मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रगतीचे वर्ष राहील. धार्मिक कार्य, मंगलकार्य, तीर्थयात्रा, दानधर्म होतील. प्रसिद्धी, पुरस्कार, मानसन्मान प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गात पदवी प्राप्त होईल.

Bhavishyanama 12.jpeg
Karuna Munde: करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, त्यांनी मला सोडलं नाही, तर...

सिंह : नवीन वर्षाची सुरुवात अनपेक्षित लाभ मिळवून देणारी राहील. कमी श्रमात धनलाभ होईल. वारसा हक्काच्या कामात फायदा मिळेल. विमा, पेन्शन, शेअर मार्केट यांतून मोठे लाभ होतील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल प्रवास जपून करावेत.

कन्या : नवीन वर्षाची सुरवात तरुणांसाठी अनुकूल राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. कोर्टकचेरीच्या कामात मोठे यश मिळेल. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल, नवीन वर्षात मोठी प्रगती होईल.

तूळ : सप्ताहाची व वर्षाची सुरुवात नवीन नोकरीची संधी देणारी राहील. परदेशातील नोकरीची संधी मिळेल हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हितशत्रूपासून भास संभवतो. चोरांपासून उपद्रव संभवतो आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यावी.

वृश्चिक : वर्षाच्या सुरुवातीला संतत्तीविषयीचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर्ससारख्या व्यवसायात मन लाभ होईल. तरुणांना जोडीदार मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत मोठे यश मिळेल. उपासना, अध्यात्माची आवड निर्माण होईल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी.

धनू : वर्षाच्या सुरुवातील नवीन वाहन, जागा, घर खरेदीसाठी प्रयत्न होतील. घरात उंची वस्तूची खरेदी होईल. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. चंद्र-गुरू युतीमुळे नवीन नोकरीची संधी मिळेल.

मकर : वर्षाच्या सुरुवातीला सहलीचे आयोजन कराल; छोटे प्रवास आनंद देणारे राहील. व्हिसा, पासपोर्टची कामे होतील. आनंदाची बातमी कळेल. नातेवाइकांचा सहवास लाभेल. भावंडांचे विवाह जमतील. कलाकार, लेखकांना प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील. खेळाडूंना मोठे यश मिळेल.

कुंभ : वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक स्थितीमध्ये वाढ संभवते. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात आनंदांची घटना घडेल. मोठी गुंतवणूक होईल. मोठे कर्ज मंजूर होईल. मुलांशी मतभेद संभवतात. शेअर मार्केटपासून दूर राहावे. चंद्र-गुरू युतीमुळे नवीन घर, वाहन खरेदी होईल.

मीन : वर्षाच्या सुरवातीला आरोग्याविषयी सतर्क राहाल. मानसिक स्थिती उत्तम राहील. आरोग्यात सुधारणा होईल. तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायाला फायदा होईल. कोर्टकचेरी, वादविवादाचे प्रश्न सहमतीने सुटतील. घरातील वातावरण गरम राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com