Amit Shah: भाजपची केंद्रात पुढची किती वर्षे सत्ता राहणार ? अमित शाहांनी पाच-दहा नव्हे, तर सांगितला थेट 'हा' आकडा

Modi Government : यूसीसी हा आमच्या पक्षाच्या स्थापनेपासूनचा प्रमुख अजेंडा असून भाजपशासित राज्यांमध्ये एक-एक करून हा समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याचं विधानही गृहमंत्री शाह यांनी यावेळी केलं.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसर्यांदा सत्तेत आला आहे. 2014 आणि 2019 च्या तुलनेत भाजपचा बहुमताचाही आकडाही घसरला आहे, तर विरोधकांच्या जागा 2019 तुलनेत चांगल्याच वाढल्या आहेत. पण तरीही भाजप नेत्यांकडून पुढची 25 वर्षे भाजप केंद्रात सत्तेत राहणार असल्याची विधानं केली जातात. याचदरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांनी 'टाइम्स नाऊ समिट 2025' या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी 'समान नागरी संहिता,राम मंदिर,आरएसएस यांसारख्या विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. तसेच त्यांनी भाजप (BJP) केंद्रात किती वर्षे सत्तेत राहणार हेही अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगून टाकलं.

अमित शाह म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाचा विजय हा त्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो. तुम्ही स्वतःसाठी नाही तर देशासाठी जगलात तर विजय तुमचाच असं मतही त्यांनी व्यक्त केलं. याचवेळी त्यांनी देशात भारतीय जनता पक्ष पुढील किमान 30 वर्षे सत्तेत राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Narendra Modi, Amit Shah
Karuna Munde: करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, त्यांनी मला सोडलं नाही, तर...

आपण भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना पुढील 30 वर्षे भाजप सत्तेत राहणार असल्याचं म्हटलं होतं. त्या 30 पैकी आत्ता फक्त 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण जेव्हा एखादा पक्ष चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा त्याला जनतेचा विश्वास आणि विजयाचा आत्मविश्वास मिळत जातो असंही शाह यांनी या सांगितले. याउलट जे पक्ष चांगली कामगिरी करत नाहीत,त्यांच्यातला आत्मविश्वास आढळून येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी संहिता (यूसीसी)कायद्यावरही केंद्र सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले,समान नागरी संहिता संविधान सभेचा निर्णय होता. मात्र,काँग्रेस ते विसरले,पण आम्ही ते विसरलेलो नाही.त्यामुळे जसं आम्ही कलम 370 हटवू असे सांगितले होते,आम्ही ते केले. तसेच आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू असं म्हटलं होतं,तेही आम्ही बांधलं. आता समान नागरी कायदा शिल्लक आहे, तेही पूर्ण करू असंही शाह यांनी सांगितले.

Narendra Modi, Amit Shah
Haribhau Bagade : Video : मोठी बातमी! राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले

यूसीसी हा आमच्या पक्षाच्या स्थापनेपासूनचा प्रमुख अजेंडा असून भाजपशासित राज्यांमध्ये एक-एक करून हा समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याचं विधानही गृहमंत्री शाह यांनी यावेळी केलं. याचवेळी आरएसएस हा भाजपचा वैचारिक स्रोत असून त्यांच्याकडून कधीच सरकारमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचंही म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com