पक्षाने डावलल्याने प्रणिती शिंदे नाराज 

आमदार प्रणिती शिंदेंवर पक्षश्रेष्ठींनी केलेल्या अन्यायाच्या निषेध म्हणून जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधींना पाठवले आहे.
mla praniti shinde upset
mla praniti shinde upset
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला ठेंगा दाखवण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनाही पक्षाने डावलल्याने आमदार शिंदेंसह त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. 

जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांची विस्तारात वर्णी लागेल, असा कार्यकर्त्यांना विश्वास होता. अखेरपर्यंत त्यांचे नाव आघाडीवर होते. परंतु ऐनवेळी मागे पडले.  प्रणिती शिंदेंना डावलण्यात आल्याने सुशिलकुमार शिंदेसह त्यांचे जिल्ह्यातील समर्थक कमालीचे नाराज झाले आहे. आज जिल्ह्यात सर्वत्र नाराजीचे पडसाद उमटले.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित थेट सोनिया गांधी आणि राहूल गांधीकडे न्याय मागितला आहे. पक्षाच्या वाढीसाठी  सुशिलकुमार शिंदे यांचे योगदान मोठे आहे. युवक आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आमदार प्रणिती शिंदेना डावलून शिंदे घराण्यावर अन्याय केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com