Mahavikas Aghadi News : शिवसेना अन् राष्ट्रवादीकडून होणार काँग्रेसची कोंडी?

Chandwad Assembly constituency : चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे राहुल आहेर आमदार आहेत. पण, चांदवड मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील पक्ष समोरा-समोर येण्याची शक्यता आहे.
sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मतदारसंघाच्या मागणीसाठी गृहपाठ सुरू केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार विजयी झाले. नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये या आघाडीला घवघवीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून एकमेकांचे मतदारसंघ हिसकावण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सहा आमदार आहेत. यामध्ये देवळाली, सिन्नर, निफाड, कळवण-सुरगाणा, दिंडोरी-पेठ, आणि नांदगाव हे मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं चांदवड देवळा या सध्या काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Sinnar Assembly Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत? ; माणिकराव कोकाटेंसमोर असणार 'हे' आव्हान!

असाच दावा शिवसेना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्षाकडूनही करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल इच्छुक उमेदवार आहेत.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Sharad Pawar News : महायुतीसाठी धोक्याची घंटा; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे डॉ. राहुल आहेर आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना येथून आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षात देखील या मतदारसंघातून उमेदवारीसाठी काही नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही पक्षांनी चांदवड देवळा मतदारसंघाला महत्त्व दिल्याने येथील राजकारण चांगले तापले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com