Nashik : 'बॉस'च्या 'बर्थ डे'ला कार्यालयातच 'ग्रॅण्ड सेलिब्रेशन'; आता 42 कर्मचाऱ्यांवर आली पश्चात्तापाची वेळ

Tribal Development Department : शासकीय कार्यालयातच 'ग्रॅण्ड सेलिब्रेशन' करणं भोवलं, 42 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
Sudarshan Nagre
Sudarshan NagreSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आदिवासी विभागातील उपायुक्त या ‘बॉस’चा बर्थ डे अन् कर्मचाऱ्यांच्या जणू अंगातच आलं. उपायुक्तांच्या अखत्यारितील 40 ते 50 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी रजा घेणे तसे अवघडच. म्हणून बर्थ डे सेलिब्रेशन कार्यालयातच ठेवण्यात आले. अगदी हॉटेलप्रमाणे कार्यालय सजवून कोल्ड फायर लावून आतषबाजी करून बर्थ डे साजरा करण्यात आला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला.

भ्रष्टाचार आणि वादग्रस्त खरेदीसाठी नावलौकिक असलेल्या आदिवासी विभागातील बर्थ डे सेलिब्रेशन चांगलेच गाजत आहे. नाशिक अपर आयुक्तालयात उपायुक्तपदावर कार्यरत असलेल्या सुदर्शन नगरे यांचा गेल्या बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे साहेबांशी जवळीक असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखला.

नगरे सपत्नीक हजर झाले, याचा अर्थ त्यांची या सोहळ्याला संमती होती. राज्याचे आयुक्त वरच्या मजल्यावर बसलेले असताना खाली हा फाईव्ह स्टार बर्थ डे साजरा झाला हे विशेष! वाढदिवसानिमित्त नगरेंच्या केबिनला गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी भारावलेल्या स्थितीत नगरे दाम्पत्यांचे स्वागत केले. यानंतर बॉस लिहिलेला केक कापण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudarshan Nagre
AAP News : लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोध हेच 'आप'चे 'लक्ष'

कार्यालयात हजर असलेल्या कोणीतरी हे चित्रीत करून सोशल मीडियावर टाकले. यानंतर मात्र काहीतरी चुकल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तोपर्यंत वेळ मात्र निघून गेली होती. दरम्यान, आयुक्त नयना गुंडे यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी कार्यालयात असे सेलिब्रेशन चुकीचे असल्याचे सांगत वाढदिवसाला हजर असलेल्या 42 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

तर मला वाढदिवसाच्या आयोजनाची कल्पना नव्हती. माझ्यासाठी ते सरप्राईज होते. मात्र, मला नोटीस मिळाली असून, त्यास उत्तर देण्यात येईल, असे उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी स्पष्ट केले. आदिवासी विभागातील खरेदी, शाळांची स्थिती, मुलींचे लैंगिक शोषण, अधिकारी व ठेकेदारांची मिलीभगत असे ठसठशीत प्रकार सातत्याने समोर येत असताना त्यात आता कार्यालयातच ‘ग्रॅण्ड बर्थ डे सेलिब्रेशन’ करण्यात आल्याचे समोर आल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

(Edited by : Ganesh Thombare)

R...

Sudarshan Nagre
Girish Mahajan : गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज; 'लोकसभेत एक तरी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com