Pune News: केंद्र सरकारचं पुणेकरांना मोठं गिफ्ट; मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा

Central Government : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील वाहतुककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. कामासाठी बाहरे पडणाऱ्या पुणेकरांसाठी शहरातील विविध रस्त्यांवर होत असलेली वाहतुककोंडी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच ट्रॅफिकच्या वाढत्या समस्येवर पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (ता.25) पार पडली. या बैठकीत पुणे (Pune) शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो (Metro) रेल्वे प्रकल्प टप्पा-2 : वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब) ला पहिल्या टप्प्याअंतर्गत विद्यमान वनाझ-रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार म्हणून मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील हे दोन उन्नत कॉरिडॉर 12.75 किमी लांबीचे असणार असून त्यात 13 स्टेशनचा समावेश आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असणार आहे.

PM Narendra Modi
Ajit Pawar: माळेगाव निवडणुकीबाबत अजितदादांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...'

हा प्रकल्प महा-मेट्रो(महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड)द्वारे राबवविला जाणार आहे. या प्रकल्पासाठीचा सर्व खर्च भारत सरकार,महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/बहुपक्षीय एजन्सी समान प्रमाणात वाटून घेणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुक सेवेतील प्रवाशांची संख्या वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

पुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यात वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन उन्नत मार्ग समाविष्ट आहेत. या नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज–रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार असून,पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला गतिमान करण्यासाठी हे निर्णायक पाऊल ठरण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi
Maharashtra Political Live Updates : रामाचे खरे भक्त असाल तर सांगा एकही ईडी चौकशी अजून भाजपच्या माणसावर का झाली नाही?- बच्चू कडूंचा प्रहार..

मंजुरी मिळालेल्या या 12.75 किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर 13 स्थानकं असतील जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडली जाणार आहेत.हा प्रकल्प IT हब्स,शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय देणार आहे.या निर्णयामुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हे नवीन मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहे. तसेच, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, जेणेकरून मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com