ठाकरेंच्या मर्जीतील कुंटे 'आऊट' अन् चक्रवर्ती राज्याचे बनले मुख्य सचिव

राज्य सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटेंना मुदतवाढ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
Debashish Charaborty and Sitaram Kunte
Debashish Charaborty and Sitaram Kunte Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारचे (Maharashtra Government) मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज (ता.30) संपला आहे. राज्य सरकारने कुंटेंना मुदतवाढ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने अखेर याला मंजुरी न दिल्याने कुंटे हे निवृत्त झाले आहेत. आता देवाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

देवाशिष चक्रवर्ती हे 1986 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते सध्या राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. विशेष म्हणजे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या विरोधातील खात्यांतर्गत चौकशी करण्यासाठी चक्रवर्ती यांची समिती राज्य सरकारने नेमली होती. या समितीने राज्य सरकारला या प्रकरणी ऑक्टोबरमध्ये अहवाल सादर केला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीरसिंह यांना या समितीने दोषी धरले होते. परमबीरसिंह यांनी नियमांचा भंग केल्याचा ठपकाही समितीने अहवालात ठेवला आहे. आता याच चक्रवर्ती यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

Debashish Charaborty and Sitaram Kunte
उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मोदींकडून मिळू शकला असता 'ग्रीन सिग्नल'!

राज्य सरकारने 28 फेब्रुवारीला कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. कुंटे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कुंटे यांच्या आधी मुख्य सचिव असलेले संजयकुमार यांना निवृत्तीनंतर महावितरण नियामक आयोगावर नियुक्त करण्यात आले होते. परंतु, सध्या कोणतेही महामंडळ रिक्त नसल्याने कुंटे यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण फेब्रुवारी अखेर सेवा हक्क विभागाचे मुख्य आयुक्त प्रमुख स्वाधीन क्षत्रीय निवृत्त होत आहेत. कुंटे यांना मुदतवाढ देऊन राज्य सरकारने हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना केंद्र सरकारकडून मुदतवाढ मिळाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Debashish Charaborty and Sitaram Kunte
जिवाच्या भीतीने कंगनाने घेतली पोलिसांकडे धाव

कुंटे हे आधी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत होते. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे यांना मुख्य सचिवपदाचा आतापर्यंत नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले होते. कुंटे यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील कुंटेंची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com