जिवाच्या भीतीने कंगनाने घेतली पोलिसांकडे धाव

कंगनाला ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याने घाबरून तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ती अडचणीत आली होती. आता तिला ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याने घाबरून तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

कंगनाने मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात तिने म्हटले होते की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहताना देशद्रोह्यांना माफ करायला नको. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये देशातीलच गद्दारांचा हात असतो. कधी पैशांच्या तर कधी सत्तेच्या मोहासाठी ते देशाशी गद्दारी करतात. त्यांनी भारतमातेला कलंकित करण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील गद्दार बाहेरील शक्तींना मदत करतात, त्याचवेळी अशा घटना घडतात.

या पोस्टनंतर ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत, असा दावा कंगनाने केला आहे. याबाबत तिने हिमाचल प्रदेश पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. कंगनाने म्हटले आहे की, भटिंड्यातील एक व्यक्ती मला जाहीरपणे ठार मारण्याची धमकी देत आहे. मी अशा प्रकारच्या भ्याड धमक्यांना घाबरत नाही. देशाच्या विरोधात षडयंत्र करणारे आणि दहशतवादी यांच्या विरोधात मी बोलतच राहीन. मग ते जवानांची हत्या करणारे नक्षलवादी, टुकडे-टुकडे गँग अथवा खलिस्तानी असोत.

Kangana Ranaut
होय, 'एनआयए'ने माझा 28 दिवस छळ केला! वाझेचा धक्कादायक कबुलीजबाब

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या शांतता व सलोखा समितीसमोर कंगनाला 6 डिसेंबरला हजर व्हावे लागणार आहे. या समितीचे प्रमुख आम आदमी पक्षाचे नेता राघव चढ्ढा आहेत. तिने सोशल मीडियावर शीख समुदायाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता कंगना चांगलीच अडचणीत आल्याचे मानले जात आहे. दिल्ली विधानसभेत तिची झाडाझडती घेतली जाणार आहे.

Kangana Ranaut
तुम्ही कोव्हिशिल्ड घेतलीय? अभ्यासातून समोर आली दिलासादायक बाब

शिखांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईतही कंगनाविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही तक्रार दिली आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खलिस्ताना ठरवून शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी दहशतवादी असा कंगनाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com