Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार

Assembly Monsoon Session: रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबविण्यात येईल. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Assembly News : राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्प मांडत असताना विविध लोकोपयोगी निर्णय घेत नव्या योजनांची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतरही राज्यातील जनतेसाठी अनेक लोकोपयोगी निर्णयाचा धडाका लावला आहे. त्याच धर्तीवर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

राज्यातील ज्येष्ठ नागरिक तीर्थ क्षेत्रांना जाऊ इच्छितात. त्यांना तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. पण त्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही. त्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना सुरु करावी, अशी मागणी करणारी लक्षवेधी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात मांडली होती. त्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थदर्शन योजना सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी लगेचच केली. (Eknath Shinde News)

विधानसभेत प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी लक्षवेधीद्वारे तीर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत विस्तृतपणे एकनाथ शिंदेंनी माहिती दिली. दरवर्षी नियमावली करुन आपण किती जणांना पाठवू शकतो हे ठरविण्यात येईल. रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबविण्यात येईल. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : मोठी बातमी! विधानपरिषदेतून रिटायर्ड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच 'हे' आमदार पित्यासह ठाकरेंच्या भेटीला, शिंदेंना धक्का?

येत्या काळात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत राज्य सरकारचे धोरण ठरवले जाईल. राज्य शासनाच्या माध्यमातून 5 हजार 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल. सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा आशिर्वाद राज्य सरकारला मिळणार आहे. आम्ही येत्या काळात नवीन निर्णय घेणार आहोत. लेक लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Eknath Shinde : "आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षावर बंगल्यावर बसून..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com