Maharashtra IAS News: मोठी बातमी: फडणवीस सरकारचा आठ दिवसांतच प्रशासनाला दुसरा धक्का; 'या' 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

State Government Transfer Orders : महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून सातत्यानं वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मंगळवारी (ता.7 एप्रिल) 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Maharashtra cadre IAS news
Maharashtra cadre IAS newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून सातत्यानं वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मंगळवारी (ता.7 एप्रिल) 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने आठ दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. सरकारकडून होत असलेल्या या बदल्यांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

फडणवीस सरकारकडून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये राहुल रंजन माहिवाल, श्वेता सिंघल, लक्ष्मण राऊत, गीतांजली बाविस्कर,करिश्मा नायर,अमित रंजन,या आयएएस अधिकाऱ्यांंच्या नावांचा समावेश आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकूण 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

  1. श्री राहुल रंजन माहिवाल (IAS:RR:2005), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे यांची नियुक्ती सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे करण्यात आली आहे.

  2. सौ. श्वेता सिंघल (IAS:RR:2009) यांची नियुक्ती विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे.

  3. श्री रुचेश जैवंशी (IAS:RR:2009) यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे करण्यात आली आहे.

  4. श्री कन्हुराज बागटे (IAS:SCS:2011) यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण येथे करण्यात आली आहे.

  5. श्री लक्ष्मण राऊत (IAS:SCS:2015), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.

Maharashtra cadre IAS news
SIT Investigation Update: खरात सोबतच्या फोन कॉल्सचे 'सीडीआर' लिक, अंधारेंनी पेटवला मुद्दा; 'एसआयटी' प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं मोठं विधान

6. सौ. गीतांजली बाविस्कर (IAS:SCS:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची नियुक्ती संयुक्त सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

7. डॉ. दिलीप जगदाळे (IAS:SCS:2015), संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण यांची नियुक्ती संयुक्त सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

8. श्री पंकज देवरे (IAS:SCS:2016) यांची नियुक्ती सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे करण्यात आली आहे.

9. सौ. मीनल करणवाल (IAS:RR:2019), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई येथे करण्यात आली आहे.

10. सौ. करिश्मा नायर (IAS:RR:2021), अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव येथे करण्यात आली आहे.

11. श्री अमित रंजन (IAS:RR:2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा व सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे करण्यात आली आहे.

Maharashtra cadre IAS news
NCP leader murder case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 4 वर्षांतच नेत्याची हत्या, वडील मुख्यमंत्री असतानाच लेकाने डाव साधला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com