SIT Investigation Update: खरात सोबतच्या फोन कॉल्सचे 'सीडीआर' लिक, अंधारेंनी पेटवला मुद्दा; 'एसआयटी' प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं मोठं विधान

Sushma Andhare SIT : मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील लॉबीच्याच लोकांचे कॉल डिटेल्स दमानिया यांनी समोर आणले आहेत,असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे केला होता. त्यांनी खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही, तर दुसरा कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं.
Ashok Kharat SIT .jpg
Ashok Kharat SIT .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik SIT PC News: राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी पहिल्यांदाच राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या एसआयटीनं पत्रकार परिषद घेत तपासाबाबतची अत्यंत महत्वाची माहिती दिली. तब्बल 17 दिवसांनंतर झालेल्या या पत्रकार परिषदेत स्वत: प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या उपस्थित राहिल्यामुळे अशोक खरात प्रकरणात काय गौप्यस्फोट केला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.या पत्रकार परिषदेत खरातसोबतच्या फोन कॉल संदर्भातला लिक झालेल्या सीडीआरबाबतही सातपुते यांनी मोठं विधान केलं आहे.

अशोक खरातच्या मोबाईलचा कथित सीडीआर आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत खळबळ उडवून दिली होती. तसेच दमानिया यांनी कथित सीडीआर समोर आणल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दमानियांच्या चौकशीची मागणी करत जोरदार हल्लाबोल केला होता.

आता या प्रकरणावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी थेट भाष्य करणं टाळलं. परंतु, सीडीआर लिक प्रकरणाची शासन स्तरावर चौकशी केली जात असून त्यात जे काही निष्पन्न होईल ते समोर येईल, असं उत्तर देत विषयच संपवला.

अंधारे काय म्हणाल्या होत्या...?

मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील लॉबीच्याच लोकांचे कॉल डिटेल्स दमानिया यांनी समोर आणले आहेत,असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे केला होता. त्यांनी अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही, तर दुसरा कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला होता.

Ashok Kharat SIT .jpg
Ashok Kharat PC: तब्बल 17 दिवसांनंतर 'एसआयटी'च्या प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच माध्यमांसमोर; 'आत्तापर्यंत 4650 आक्षेपार्ह लिंक्स...'

याचदरम्यान,अंधारेंनी या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती दीपक केसरकर असल्याचा दावा केला होता. एसआयटीकडून त्यांना कधी चौकशीला बोलावले जाणार याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. तसेच शिंदेंवर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे, पण नाईलाजानं आता त्याच्या तपासाच्या गतीवरही टीका करावी लागतेय, असं अंधारे म्हणाल्या होत्या.

अशोक खरात प्रकरणात गंभीर आरोप होऊनही रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत चौकशीला बोलावलं जात नसल्याचा मुद्दाही अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना मांडला होता. याचवेळी त्यांनी खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याच्यावर कारवाई का केली जात नाही? सीए ललित पोकळे याची चौकशी का केली जात नाही? काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणात हात असून त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिल्यानंतरही त्यावर अद्याप काहीही कारवाई केली जात नाही, असे ठळक मुद्दे अंधारे यांनी मांडले होते. त्यामुळे आता सीडीआर प्रकरणी एसआयटीची भूमिका स्पष्ट झाली आहे.

Ashok Kharat SIT .jpg
Nagpur RSS Headquarters: नागपूरमधून धक्कादायक अपडेट समोर,'RSS'च्या कार्यालयाजवळ स्फोटकं आढळली; पोलिसांचा तडकाफडकी मोठा निर्णय

एसआयटीचं एकूण 24 जणांचं पथक

एसआयटीने 20 मार्चपासून अशोक खरात प्रकरणी तपास सुरू केला असून नाशिकचा 1 आणि इतर 10 असे एकूण 11 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडून सुरू असल्याचं प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं. दोन पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार यांसह एकूण 24 जणांचं पथक तपासासाठी कार्यरत आहे,असंही सातपुते यांनी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com