
मोठं दिवाळी गिफ्ट: फडणवीस सरकारकडून एकाच दिवशी तब्बल 10,309 उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
अनुकंपा व MPSC भरती: यामध्ये 5,187 अनुकंपा उमेदवार आणि 5,122 एमपीएससी लिपिक-टंकलेखक उमेदवारांचा समावेश आहे.
विभागनिहाय वाटप: कोकण विभागातील 3,078 उमेदवार सर्वाधिक असून विदर्भ, मराठवाडा, पुणे आणि नाशिक विभागातील उमेदवारांनाही नियुक्ती मिळणार आहे.
Over 10,000 Candidates to Receive Appointment Letters in a Day : फडणवीस सरकारकडून यंदा अनेकांना दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे सरकारने मार्गी लावली असून एकाचवेळी तब्बल 5 हजार 187 अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे एमपीएससीच्या लिपिक-टायपिस्ट श्रेणीतील 5 हजार 122 उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल 10 हजार 309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. फडणवीस सरकारचा हा रेकॉर्ड ठरणार आहे.
कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा मुलास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. परंतु तांत्रिक अडचणी व इतर विलंबामुळे अनेक वर्षे नियुक्त्या रखडल्या होत्या. ही खूप संवेदनशील बाब होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना देऊन याबाबत सातत्याने आढावा घेतला.
सरकारने नवीन अनुकंपा धोरण तयार केले. त्यामुळे एकाचदिवशी 5 हजारांहून अधिक अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्रे देणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपीक-टंकलेखक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून 5 हजार 122 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यांच्या नियुक्तीची शिफारस आयोगाकडून सरकारकडे करण्यात आली होती.
या सर्व उमेदवारांना 4 ऑक्टोबरला नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. उमेदवारांपैकी सर्वाधिक 3 हजार 78 उमेदवार कोकण विभागातील आहेत. तर विदर्भातून 2597, मराठवाड्यातून 1710, पुणे विभागातून 1674 आणि नाशिक विभागातून 1250 उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
Q1 : किती उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्र मिळणार आहे?
A : 10,309 उमेदवारांना.
Q2 : अनुकंपा उमेदवार किती आहेत?
A : 5,187 अनुकंपा उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.
Q3 : एमपीएससी लिपिक-टंकलेखक उमेदवार किती आहेत?
A : 5,122 उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे.
Q4 : सर्वाधिक नियुक्ती कोणत्या विभागातील उमेदवारांना मिळणार आहे?
A : कोकण विभागातील 3,078 उमेदवारांना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.