Lal Bahadur Shastri Birth Anniversary : ना कोणता बडेजाव, ना पदाचा मोह..! सायकलवर बाजारात जाणारे पंतप्रधान...

A Prime Minister Known for Simplicity and Humility : लाल बहादूर शास्त्रीजी 1991-63 या कालावधीत देशाचे गृहमंत्री होते. तसेच वाणिज्य मंत्री म्हणूनही त्यांनी देशसेवा केली. त्यानंतर 9 जून 1964 मध्ये त्यांना देशाचे दुसरे पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला.
“Lal Bahadur Shastri, the humble Prime Minister, remembered for his simplicity and dedication to the nation.”
“Lal Bahadur Shastri, the humble Prime Minister, remembered for his simplicity and dedication to the nation.”Sarkarnama
Published on
Updated on

Lessons from Lal Bahadur Shastri’s Life and Leadership : भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाची मिसाल आजही दिली जाते. ना कोणता बडेजाव ना अहंकार. अत्यंत निष्ठेने त्यांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात. रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी दिलेला राजीनामा म्हणजे त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि आदर्शमूल्यांचे प्रतिक मानले जाते. पंतप्रधान असताना ते अनेकदा सायकवर दिसायचे.

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 1904 मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसरायमध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. शाळेमध्ये शिकत असतानाच ते स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. वाराणशीतील हरिश्चंद्र हायस्कुलमधील शिक्षणक निष्कामेश्वर प्रसाद मिश्र यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचा मोठा परिणाम शास्त्रींच्या मनावर झाला.

लाल बहादूर शास्त्री यांनी त्यावेळी काशी विद्यापीठात प्रवेश घेत तिथून दर्शनशास्त्री आणि नीतिशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली होती. असहकार आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यलढ्यात उडी घेत ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. गांधींजींच्या दांडी यात्रेनंतर ब्रिटीशांना एक प्रतिकात्मक संदेश देण्यात आला आणि लाल बहादूर शास्त्रींनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले.

“Lal Bahadur Shastri, the humble Prime Minister, remembered for his simplicity and dedication to the nation.”
RSS centenary : नेहरूंमुळं RSS ला ‘तो’ मान मिळाला, आज तेच टपाल तिकीटावर आलं..! पंतप्रधान मोदींचेही गौरवोद्गार

लाल बहादूर शास्त्री यांनी ब्रिटीशांनी जवळपास नऊ वर्षे तुरुंगात ठेवले होते. त्यांच्यासाठी हा कालखंड स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे नेतृत्व अधिक कणखर करण्यासही कारणीभूत ठरला. अनेक क्रांतीकारक, समाजसुधारकांविषयी त्यांनी जेलमध्ये प्रचंड वाचन केले. स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यानेच शास्त्रींना ताकद दिली. लाल बहादूर शास्त्री हे प्रखर देशभक्त होते. त्यांचे साधे राहणीमान, कोणत्याही पदाचा मोह नाही, केवळ देश अन् जनसेवेसाठी समर्पित भावनेतून ते कार्य करत राहिले. पंतप्रधान असताना वैयक्तिक कामांसाठी त्यांनी कधीही सरकारी वाहनाचा वापर केला नाही. ते सायकलवर बाजारात जात होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये ते देशाचे पहिले रेल्वेमंत्री बनले. त्याआधी उत्तर प्रदेशातील त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. रेल्वेमंत्री असताना 1956 मध्ये एका रेल्वे अपघातात 146 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आजही या राजीनाम्याची मिसाल दिली जाते.

“Lal Bahadur Shastri, the humble Prime Minister, remembered for his simplicity and dedication to the nation.”
Anil Joshi News : राहुल गांधींची रणनीती, भाजपचे माजी मंत्री अनिल जोशी काँग्रेसच्या वाटेवर; कृषी कायद्यांना केला होता कडाडून विरोध...

शास्त्रीजी 1991-63 या कालावधीत देशाचे गृहमंत्री होते. तसेच वाणिज्य मंत्री म्हणूनही त्यांनी देशसेवा केली. त्यानंतर 9 जून 1964 मध्ये त्यांना देशाचे दुसरे पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी आली होती. या पदावर ते केवळ 19 महिने राहिले. हा काळही त्यांच्यासाठी आव्हानात्मक होता. 1965 मध्ये पाकिस्तानसोबत युध्द झाले. या युध्दावेळी त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला. सैन्याचे मनोबल वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली होती. हा नारा आजच्या परिस्थितीतही तेवढाच महत्वपूर्ण आहे. लाल बहादूर यांनी आपली सर्व संपत्ती दान केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com