Farmer ID registration : शेतकऱ्यांनो, तातडीने काढा ‘फार्मर आयडी’; कृषि योजनांपासून राहावे लागेल वंचित, 'त्या' 40 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचे नाव आहे का?

Maharashtra farmer scheme : फार्मर आयडी नोंदणी ने केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Farmers
Maharashtra Farmerssarkarnama
Published on
Updated on

Agriculture scheme benefits : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. पुढील काळात फार्मर आयडीशिवाय शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. एवढेच काय तर खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी दाखवावा लागणार आहे. मागील महिन्यापर्यंत १ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे.

राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार आहे. त्यानुसार अद्याप सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. कृषि विभागाने या शेतकऱ्यांना त्यासाठी २० मेपर्यंतची मुदत दिली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊ शकतात. तसेच स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

फार्मर आयडी नोंदणी ने केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

Maharashtra Farmers
West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालच्या ‘एक्झिट पोल’मध्ये मोठा ट्विस्ट; ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ची माघार, कारण ठरले मतदार...

राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार असून, त्यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध बियाणे, खते, औषधे आदी मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना त्यापासून मुकावे लागू शकते.

Maharashtra Farmers
Bhagwant Mann news : पंजाब सरकार कोसळणार? 6 खासदारांनी झटका देताच मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय; भाजपच्या भीतीने धाबे दणाणले...

पुणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे (मो. क्र. ७५८८५०९४९२), नागपूर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९), कोकण विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८), अमरावती विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९), छत्रपती संभाजीनगर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी शीतल कौदरे (मो. क्र. ९१७२३१९६३७) आणि नाशिक विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com