Tukaram Mudhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! आता 'या' विभागाचे सचिव म्हणून पाहणार कामकाज

अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे.
Tukaram Munde
Tukaram MundeSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Mudhe : अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागात ते आता काम पाहणार आहेत. सध्या असंघटीत कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून ते काम पाहत होते. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. तात्काळ प्रभावानं नव्या नियुक्तीच्या ठिकाणी कार्यभार स्विकारण्याची सूचना देखील त्यांना करण्यात आली आहे.

Tukaram Munde
Rajabhau-Babri Munde : राजाभाऊ, बाबरी मुंडेंचा प्रभाव वडवणी, धारूरमध्येच! पंकजा मुंडेंना फटका बसणार?

सामान्य प्रशासनं विभागानं त्यांची नव्या ठिकाणी बदली करण्यामागील कारणंही स्पष्ट केलं आहे. दिव्यांग कल्याण विभागातील सचिवपद रिक्त होतं, त्यामुळं त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. तसंच या विभागात काम करताना काही उद्दीष्ट्ये साध्य करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नव्या ठिकाणी ई-ऑफिस आणि e-HRMS यांचा वापर वाढवण्यावर विशेष लक्ष देण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे.

Tukaram Munde
Ahilyanagar Congress : काँग्रेसकडून जबाबदारी मिळताच दीप चव्हाण "ॲक्टिव्ह"; 400 कोटीच्या योजनेवरून 'हल्लाबोल'

मुंढेंसह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे यांच्यासह इतर चार आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत.

  1. IAS नितीन पाटील यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन राज्य कर विभागात विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

  2. IAS अभय महाजन यांची राज्य कर विभागाच्या विशेष आयुक्तपदावरुन महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

  3. IAS ओमकार पवार यांची बदली इगतपुरी उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदावरुन नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे.

  4. IAS आशा पठाण यांची नागपूर मुख्यमंत्री सचिवालयात सहसचिवपदावरुन नागपूरच्याच वनमती इथं महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tukaram Munde
Aditya Thackeray: "कबूतरं म्हणजे शिंदेंचे आमदार नाहीत...."; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं

20 वर्षांच्या कार्यकाळात २३ व्यांदा बदली

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या आजवरच्या २० वर्षांच्या सेवाकाळात ही २३ व्यांदा बदली झाली आहे. अनेकदा त्यांच्या कार्यपद्धतीवर संबंधित विभागातील लोक नाराज असल्याचं ऐकायला मिळतं. ही नाराजी केवळ कडक कार्यशैलीमुळं असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळं आजवर इतक्या बदल्या होण्यामागं राजकीय हस्तक्षेपाचाही चर्चा व्हायची. त्यामुळं तुकारामं मुंढेंची बदली झाली की नव्या विभागातील लोकांना धडकी बसते, असंही बोललं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com