Pune Market Committee : दीड वर्षातच अनागोंदी कारभार, पुणे बाजार समिती बरखास्तीच्या मार्गावर?

समितीसह सभापतींविरोधात अविश्‍वासाचा ठराव पारित करण्यासाठी सभा आयोजित करायची असून त्याला परवानगी मिळावी यासाठी दहा संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असून आता या सभेची तारीख कधी मिळणार? याची वाट आता संचालक पाहत आहेत.
Pune Market Committee
Pune Market CommitteeSarkarnama
Published on: 
Updated on: 

गणेश कोरे

Pune News, 24 August : पुणे बाजार समितीमधील संचालक मंडळाच्या कारभाराला आता पणन संचालनालय देखील कंटाळले आहे. मागील दिड वर्षातील संचालक मंडळाच्या कारभारामुळे त्रस्त झालेले बाजार घटक आता समिती बरखास्त होण्याची वाट बघत आहेत.

समितीसह सभापतींविरोधात अविश्‍वासाचा ठराव पारित करण्यासाठी सभा आयोजित करायची असून त्याला परवानगी मिळावी यासाठी दहा संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असून आता या सभेची तारीख कधी मिळणार? याची वाट आता संचालक पाहत आहेत.

21 वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर सलग 21 वर्षे प्रशासक (Administration) आणि प्रशासकिय मंडळाच्या हातात समितीची सुत्रे होती. मागील दिड वर्षांपूर्वी निवडणूक होऊन संचालक मंडळ नियुक्त झाले. मात्र, यामध्ये 21 वर्षापूर्वी भ्रष्टाचाराचा ठपका असलेले उमेदवारच संचालक म्हणून निवडुन आले.

त्यानंतर पुणे (Pune) बाजार समिती विविध गैरकारभारांच्या प्रकरणामुळे चर्चेत राहिली. यानंतर दोन चौकशी समित्या स्थापन केल्या गेल्या मात्र या समित्यांचा अहवाल काय हे अद्याप समोर आलं नाही. यानंतर, सभापती दिलीप काळभोर यांच्याकडून सह्याचे अधिकार काढून घेण्याचा ठराव, झाल्यानंतर ते अधिकार कोणाला द्यायचे याबाबतचा तांत्रिक आणि कायदेशिर मुद्दा उपस्थित झाला.

Pune Market Committee
VIDEO : CM शिंदे अन् फडणवीसांविरोधात 'मनसे'चे उमेदवार देणार? राज ठाकरेंनी चार वाक्यात विषय संपवला

तर काळभोर यांनी पणन संचालक आणि विभागीय सह निंबधकांकडे या संदर्भात अपिल केलं आणि सह्यांच्या अधिकाराचे प्रकरण सुनावणीत अडकल्यामुळे समितीचे कामकाज ठप्प झालं. दरम्यान, आता सभापतींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चुकीचे निर्णय घेतले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे समितीचे नुकसान होत असल्याचा आरोप दहा संचालकांनी केला आहे. तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी सभा आयोजित करण्यासाठी संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

तर सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढून ते संचालक प्रशांत काळभोर यांच्याकडे देण्यात आल्यानंतर ठरावाच्या अंमलबजावणीस अडचणी येत असून या संदर्भात मार्गदर्शन करावे, असे पत्र बाजार समितीच्या प्रभारी सचिवांनी पणन संचालकांना दिलं आहे.

Pune Market Committee
Dhananjay Mahadik : "महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत," घाटगेंच्या प्रश्नावर खासदार महाडिक असं का म्हणाले?

शिवाय काळभोर यांनी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकड ठरावाच्या निर्णयाला आव्हान दिलं. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता बाजार समितीत सह्या नेमक्या कोणी करायच्या? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही गटांकडून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांनी ऐकायचं कोणाचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणासमोर पणन संचालनालय देखील हात टेकल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com