Pune Market Scam : पुणे बाजार समितीत घोटाळ्यांची मालिका? 51 गंभीर मुद्द्यांवर विशेष चौकशी सुरू, पणन संचालकांचा दणका!

Pune APMC Inquiry Committee : राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही बाजाराची कारभारावर आक्षेप घेत बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती.
Director of Marketing initiates high-level probe into Pune APMC; special committee to investigate 51 alleged irregularities.
Director of Marketing initiates high-level probe into Pune APMC; special committee to investigate 51 alleged irregularities. sarkarnama
Published on
Updated on

Pune Market Scam News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या संदर्भात सखोल चौकशीचे आदेश पणन संचालकानी दिले आहेत. या चौकशीसाठी 51 महत्त्वपूर्ण मुद्दे निश्‍चित करण्यात आले असून, एक एप्रिल 2023 ते सात जुलै 2025 या कालावधीतील संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

या चौकशीसाठी पणन संचालक विकास रसाळ यांनी जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या सहकार्याला संजय कृष्णा पाटील, दिगंबर हौसारे, विजय सावंत, सुनील धायगुडे आणि सुनील जाधव यांचा समावेश असलेल्या विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या चौकशीत वाहनतळ शुल्क वसुलीतील गोंधळ, डमी अडत्यांकडून दुबार विक्री, उपकर चुकवेगिरी, नोटरी करार, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण आणि त्यातून बेकायदेशीर वसुली, बनावट पावती पुस्तके वापरण्याचे प्रकार, तसेच चायनीज भाज्यांची आवक व त्यावरील उपकर टाळण्याचे प्रकार यांचा समावेश आहे.

Director of Marketing initiates high-level probe into Pune APMC; special committee to investigate 51 alleged irregularities.
Sanjay Gaikwad Video : शिंदेंच्या आमदाराचा मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी फडणवीसांना विचारला जाब; म्हणाले, तुमच्या राज्यात...

विशेष म्हणजे, बाजार समितीने पूर्वीच्या काही आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यात वाहनतळ व सुरक्षा रक्षक निविदा, शेतमाल नोंदी यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता समितीच्या मालमत्ता वापर, उत्पन्न-खर्चातील विसंगती, कंत्राटी व्यवहारातील पारदर्शकता, कर्मचारी भरती, बांधकामे, करार याबाबत स्वतंत्र तपास केला जाणार आहे.

माधुरी मिसळांनी केली होती तक्रार

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही बाजाराची कारभारावर आक्षेप घेत बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. यानंतर चौकशी प्रक्रियेला वेग आला आहे. सध्या समितीच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी वाढत असून, तपास अहवालानंतर संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Director of Marketing initiates high-level probe into Pune APMC; special committee to investigate 51 alleged irregularities.
Prajakt Tanpure BJP allegation : ग्रामविकासचा बनावट आदेश, भाजपचं निवडणुकीतील षड्‍यंत्र; माजी मंत्री तनपुरेंचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com