Job Opportunity in BDL : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर; फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड

Job Opportunity in Bharat Dynamics Limited : विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली
Job Opportunity in Bharat Dynamics Limited
Job Opportunity in Bharat Dynamics LimitedSarkarnama
Published on
Updated on

BDL Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हैद्राबादस्थित भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही कंपनी भारतातील दारूगोळा आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या उत्पादक कंपन्यापैकी एक आहे. या कंपनीमध्ये विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे, याबाबतची माहिती जाणून घ्या... (Job Opportunity in Bharat Dynamics Limited )

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) या कंपनीने विविध पदांच्या एकूण 361 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कंपनीमध्ये प्रकल्प अभियंता 136 पदे, प्रकल्प सहाय्यक-142 पदे, प्रकल्प कार्यालय सहाय्यक 83 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराने भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 फेब्रुवारी 2024 आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Job Opportunity in Bharat Dynamics Limited
Job Opportunity in NDA : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये नोकरीची संधी; 198 जागा भरणार

शैक्षणिक पात्रता आणि निकष

या भरतीमधील विविध पदासाठी शैक्षणिक पात्रता ही प्रकल्प अभियंता या पदासाठी उमेदवार हा BE किंवा B.Tech असावा, तसेच प्रकल्प सहाय्यक पदासाठी 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा समतुल्य अभ्यासक्रम जसे की मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर्स/सिव्हिल/मेटलर्जी/केमिकल उत्तीर्ण असावा. याशिवाय प्रकल्प कार्यालय सहाय्यक पदासाठी उमेदवार हा ITI उत्तीर्ण असावा. त्यासाठी उमेदवाराने फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीशियन / मेकॅनिकल / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रो प्लेटिंग / संगणक / डिझेल मेकॅनिक /रेडिओ मेकॅनिक या पैकी कोर्स घेऊन उत्तीर्ण असावे.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 14 फेब्रुवारी 2024 रोजी 28 पेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांची सुट दिली जाणार आहे. तसेच ओबीसीसाठी उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराकडे 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आय़टीआय विद्यार्थ्याने अप्रेंटिस म्हणून काम केले असल्यास ते अनुभव म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज कंपनीच्या अधिकृत (e www.bdl-india.in) संकेतस्थळावर ऑनलाईन सबमिट करायचा आहे. यासाठी उमेदवारांकडून पद क्रमांक एकसाठी 300 रुपये आणि पद क्रमांक 2 आणि 3 साठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

हे शुल्क ऑनलाईन भरणा करायचे आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार नाही किंवा प्रवेश दिला जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीची तारीख वेळ यासह इतर सविस्तर माहिती पाहण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

(Edited By-Ganesh Thombare)

Job Opportunity in Bharat Dynamics Limited
Nagpur: नोकरीची संधी...! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 680 पदांची भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com