Job Opportunity in NDA : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये नोकरीची संधी; 198 जागा भरणार

Job Opportunity in National Defence Academy : तरुणांसाठी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये नोकरी करण्याची संधी
NDA
NDASarkarnama
Published on
Updated on

Career News : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. खडकवासला येथील प्रसिद्ध राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्यावतीने विविध पदांच्या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 198 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात... (Job Opportunity in National Defence Academy)

पुण्यातील खडकवासला येथे असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (NDA) गट-क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ड्रायव्हर, सुतार, फायरमन, कंपोझिटर, कुक, टेक्निकल अटेंडंट (TA), स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट आणि मल्टि-टास्किंग स्टाफ (MTS) अशा विविध पदासांठी 198 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. Job Opportunity in NDA

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NDA
Mahavitran : महावितरणमध्ये 468 पदांची बंपर भरती; आताच अर्ज करा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 'एनडीए'च्या ndacivrect.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर उमेदवाराने 'एनडीए'च्या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये उमेदवाराला वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूकपणे सादर करणे आवश्यक आहे.

एनडीए ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने NDA पुणेच्या अधिकृत वेबसाईट ndacivrect.gov.in च्या होमपेजवर “NDA Group C Apply Online 2024” लेबल असलेली लिंक शोधावी. त्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. तुम्ही या अर्जाची प्रत डाऊनलोड करून ठेवणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा कालावधी 27 जानेवारी 2024 ते 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षाची कमाल सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त भरतीबाबतचा अधिकचा तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवर भेट देऊन भरतीची अधिसूचना पाहून घ्यावी.

https://drive.google.com/file/d/1Ksrw6aoHCKL2v6uQQ0LrQ3MGihERpDw8/view

R...

NDA
Nagpur: नोकरीची संधी...! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 680 पदांची भरती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com