election commission
election commissionsarkarnama

Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातील 'या' दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य

Election Commission News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून होत असलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असून, दररोज आढावा घेतला जातो.
Published on

Kolhapur News, 6 May : कोल्हापूर आणि हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार थांबला असताना रविवारी ( 5 मे ) निवडणूक प्रशासनाने उमेदवारांच्या खर्चाचा तपशील जाहीर केला. या खर्चाच्या तपशिलावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय मंडलिक आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या खर्चात तफावत दिसून आली आहे.

या दोन्ही मतदारसंघात सर्वात जास्त खर्च कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला आहे. त्या पाठोपाठ शाहू महाराज छत्रपती यांनी केला आहे. मात्र, निवडणूक आयोगानं काढलेला खर्च आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती, यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आयोगानं दोन्ही उमेदवारांना नोटीसा बजावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून होत असलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असून, दररोज आढावा घेतला जातो. दैनंदिन प्रचारात उमेदवाराने किती खर्च केला याचा आढावा दिवसेंदिवस निवडणूक प्रशासनाला ( Election Commission ) मिळतो. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस संपल्यानंतर निवडणूक प्रशासनाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपशील जाहीर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज व शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी खर्चाच्या तफाकतीवर आक्षेप घेतला आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) यांचा खर्च 41 लाख 41 हजार 484 रुपये एवढा झाला आहे. त्यांच्याकडून एकूण खर्चापैकी खर्चापैकी 4 लाख 78 हजार 400 रूपये इतका खर्च अमान्य केला आहे. तर संजय मंडलिक यांचा खर्च 52 लाख 29 हजार 828 रुपये एवढा झाला आहे. त्यांनी 21 लाख 20 हजार 392 रुपये खर्च अमान्य केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

election commission
Rajvardhan Kadambande: कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख तीन उमेदवारांनी देखील आपला खर्च निवडणूक प्रशासनाला दिला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक खर्च स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केल्याचे दिसून येते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 27 लाख 47 हजार 957 रूपये, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांनी 20 लाख 64 हजार 564 रूपये, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी 18 लाख 53 हजार 231 इतका खर्च दाखवला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

election commission
Chetan Narke News : आडवा पाय माराल तर गाठ माझ्याशी, शाहू महाराजांना पाठिंबा देताना चेतन नरकेंनी दिला इशारा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com