Lok Sabha Election 2024 : निवडणुकांसाठी ठाणे जिल्हा सज्ज; तब्बल 'इतक्या' केंद्रांवर होणार मतदान...

Election Voting For Fifth Phase : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Thane Election News : ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये 36 मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये असणार आहेत. (Latest Marathi News)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुलभ निवडणूक संकल्पनेनुसार ही सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, उन्ह लागू नये म्हणून सावलीची व्यवस्था, रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar News : बंडानंतर अजित पवारांनी सतत व्यक्त केली 'ती' खदखद, आता शरद पवारांनी सगळंच काढलं

सर्वाधिक मतदान केंद्रे मुरबाड तर सर्वात कमी उल्हासनगरमध्ये -

ठाणे जिल्ह्यात एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 2191 केंद्रे आहेत. यात 134 - भिवंडी ग्रामीण (अ.ज) - 345 मतदान केंद्रे, 135 - शहापूर (अ.ज.) – 326 मतदान केंद्रे, 136 - भिवंडी पश्चिम - 297 मतदान केंद्रे, 137 - भिवंडी पूर्व - 314 मतदान केंद्रे, 138 - कल्याण पश्चिम - 398 मतदान केंद्रे, 139- मुरबाड - 511 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2024
BJP Political Analysis : उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा यंदा प्रखर संघर्ष

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 1960 मतदान केंद्रे असून यामध्ये 140 - अंबरनाथ (अ.जा.) - 319 मतदान केंद्रे, 141 – उल्हानगर- 251 मतदान केंद्रे, 142 - कल्याण पूर्व - 321 मतदान केंद्रे, 143 - डोंबिवली - 269 मतदान केंद्रे, 144 - कल्याण पश्चिम - 406 मतदान केंद्रे, 149- मुंब्रा कळवा - 394 मतदान केंद्रे एवढी संख्या आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 2453 मतदार केंद्रांची संख्या आहे. यामध्ये 145 - मिरा भाईंदर - 451 मतदान केंद्रे, 146 - ओवळ माजिवाडा - 466 मतदान केंद्रे, 147- कोपरी पाचपाखाडी - 366 मतदान केंद्रे, 148- ठाणे - 361 मतदान केंद्रे, 150- ऐरोली - 429 मतदान केंद्रे, 151- बेलापूर - 380 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामधील सर्वाधिक 511 मतदान केंद्रे आहेत. तर सर्वात कमी मतदार केंद्रे उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 251 मतदार केंद्रे आहेत.

Lok Sabha Election 2024
Deputy CM Post : एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असणारे भारतातील 7 राज्ये

मॉडेल मतदान केंद्रे -

यामध्ये जिल्ह्यात एकूण 18 मतदान (Voting) केंद्रे ही महिलांद्वारे चालविण्यात येणार आहेत. तसेच 18 मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि 18 मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालविण्यात येणार आहेत.

3325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग -

जिल्ह्यातील एकूण 6604 मतदान केंद्रांपैकी 3325 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 1107 मतदान केंद्रे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील 991 केंद्रे व ठाणे लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील 1227 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com