Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काकडून मोठी कारवाई, पुण्यात...

Pune Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या आधी दोन ते तीन दिवस मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखविली जातात.
excise department seize 4 lakh alcohol
excise department seize 4 lakh alcohol sarkarnama

Pune News, 6 May : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता सुरू आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती (Baramati), शिरूर ( Shirur), मावळ (Maval) आणि पुणे शहर या लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. मंगळवारी (7 मे) रोजी बारामती लोकसभेचे मतदान होत आहे. तर 13 मे ला उर्वरित तिन्ही मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.

निवडणुकीच्या काळात कोणताही गैरव्यवहार अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ( Election Commission ) राज्य सरकारच्या विविध विभागांना आवश्यकता सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे वेगवेगळ्या भागात छापे देखील घातले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या चार दिवसांत हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री परिसरात तसेच म्हाळुंगे येथे अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, तसेच अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे मारुन सुमारे पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दहा जणांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या आधी दोन ते तीन दिवस मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखविली जातात. यामध्ये प्रामुख्याने पैशाचे तसेच मद्यपानाचे प्रलोभन दाखवले जाते. या प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.

या मोहिमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे. मात्र, असे असले तरी निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मोफत दारू वाटप तसेच प्रकारे पैशांचे वाटप केले जात असल्याची तक्रार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.

excise department seize 4 lakh alcohol
Lok Sabha Election News : ऐन लोकसभा निवडणुकीत सरकारचा मोठा निर्णय; 'डीप फेक' केल्यास...

या तक्रारींची दखल घेत भरारी पथके वेगवेगळ्या भागात जाऊन तपास करत आहेत. तसेच बेकायदा दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे मारले जात आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या छाप्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

हे छापे प्रामुख्याने उंड्री, डुडूळगाव या भागात टाकण्यात आले. उंड्री भागात कारवाई करत 68 हजार रुपये किंमतीचा माल तर म्हाळुंगे भागात कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली.


( Edited By : Akshay Sabale )

excise department seize 4 lakh alcohol
Solapur Lok Sabha 2024: मतदानासाठी सोलापूर प्रशासन सज्ज; मोहोळमध्ये सव्वातीन लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com